सोलापुरच्या माळरानावर आढळला दुर्मिळ अल्बीनो पक्षी !

सोलापुरच्या माळरानावर आढळला दुर्मिळ अल्बीनो पक्षी !

सोलापूर : 1 ते 7 ऑक्टोबर या कालावधीत वन्यजीव सप्ताह साजरा केला होता. सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी सोलापूरच्या माळरानावर डोंबारी/माळचिमणी या जातीचा नर अल्बीनो पक्षी आज निरीक्षण करत असताना आढळला आहे. 

शिवानंद हिरेमठ आणि महादेव डोंगरे माळरानावर पक्षी निरीक्षण करत होते. त्यांच्या समोरून 8-10 पक्षी उडत गेले. यामध्ये पूर्ण पांढरा रंग असलेला एक पक्षी दिसला. थोड्या अंतरावर हे सर्व पक्षी उतरले. व्यवस्थित निरीक्षण केल्यावर लक्षात आले की यामधील हा एक पक्षी अतिशय दुर्मिळ अल्बीनो प्रकारातील पक्षी आहे.

अल्बीनिजम हा अनुवांशिक व जन्मजात होणारी नैसर्गिक घटना आहे. त्यांच्या शरीरात मेलनिन रंगद्रव्यांचा अभाव असतो. डोळे लाल किंवा गुलाबी असतात. ही प्रक्रिया फार दुर्मिळ असते. पूर्णतः पांढर्‍या रंगाचा  असल्यामुळे अल्बीनो पक्ष्यांना ओळखणे फार अवघड नाही. रंगद्रव्याच्या अभावामुळे त्यांना बर्‍याच अडचणींचा सामना करावा लागतो जसे की अंधत्व , कमकुवत पिसे, या कारणांमुळे अल्बीनो पक्षी हे फार काळ जगत नाहीत, असे पर्यावरण अभ्यासक शिवानंद हिरेमठ यांनी सांगितले. 

पाहा व्हिडीओ -  (सौजन्य : शिवानंद हिरेमठ)