बालगंधर्व स्मृतिदिनी रंगली ‘विश्व तिचे काव्य तिचे’ संगीत मैफिल

बालगंधर्व स्मृतिदिनी रंगली ‘विश्व तिचे काव्य तिचे’ संगीत मैफिल

सोलापूर : कै. सिद्धा पाटील स्मृती समिती आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखेतर्फे नटसम्राट बालगंधर्व स्मृतिदिनी कलावंत अमीर तडवळकर आणि संगीता बिराजदार यांचा स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर ‘विश्व तिचे काव्य तिचे’ संगीत मैफिल रंगली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. माधवी रायते होत्या. सिद्धा पाटील स्मृती समितीचे मल्लिकार्जुन पाटील, शशिकांत पाटील, नागनाथ पाटील, महेश पाटील, ॲड. आशुतोष पाटील, महेश अंदेली, नाट्य परिषदेचे जोतिबा काटे, उपाध्यक्ष किल्लेदार आदी होते.

प्रा. ज्योतिबा काटे यांनी प्रास्ताविक केले. सिद्धा पाटील स्मृती समितीच्या वतीने गेल्या ४५ वर्षांपासून हा उपक्रम सुरू असल्याची माहिती दिली. डॉ. रायते यांनी पाटील परिवाराचे ऋण व्यक्त केले. मंजूषा गाडगीळ यांनी खुमासदार शैलीत सूत्रे सांभाळली. सुहास मार्डीकर यांनी आभार मानले.

डॉ. संध्या अन् नंदा जोशींचे जुळले सूर...
सत्कार सोहळ्यानंतर ‘विश्व तिचे, काव्य तिचे’ ही मैफिल रंगली. त्यात डॉ. संध्या जोशी आणि नंदा जोशी यांचा सहभाग होता. प्रशांत देशपांडे यांनी गीते, अभंग, नाट्यपदे गायली. त्यांना की- बोर्डवर जब्बार मुर्शद, तबल्यावर नितीन दिवाकर यांनी साथ दिली.

पहा संपूर्ण कार्यक्रम -