बंडातात्या पंढरपुरात आलात तर काळं फासू!

बंडातात्या पंढरपुरात आलात तर काळं फासू!

bandatatya karadkar ncp pandharpur news

सोलापूर :
महिलांसंदर्भात बदनामीकारक वक्तव्य केल्याबद्दल वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर bandatatya karadkar यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसने पंढरपूर उपविभागीय अधिकारी विक्रम कदम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

बंडातात्या यांनी केलेले हे वक्तव्य अतिशय निंदनीय असून संपूर्ण महाराष्ट्रतील महिलांचा हा अपमान आहे. आम्ही राष्ट्रवादी युवती काँग्रेस समस्त वारकरी संप्रदाय यांना विनंती करीत आहोत की  वारकरी संप्रदायला बदनाम करणार्‍या अश्या विकृतीला वारकरी संप्रदायामधून हाकलून द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसने केली आहे. 

बंडा तात्या यांना पंढरपूरमध्ये पाऊल ठेऊ देणार नाही. पांडुरंगाच्या मंदिराची पायरी चढू देणार नाही आणि तसा प्रयत्न जरी केला तर ही राष्ट्रवादी युवती काँग्रेस तुमच्या तोंडाला काळ फारसल्याशिवाय राहणार नाही, असे राष्ट्रीवादी युवती जिल्हाध्यक्ष श्रीया भोसले shiya bhosale यांनी म्हटले आहे.

यावेळी राष्ट्रीवादी युवती जिल्हाध्यक्ष श्रीया भोसले, ओ.बी.सी. महिला जिल्हाध्यक्ष साधनाताई राऊत, महिला जिल्हा कार्याध्यक्षा रंजनाताई हजारे, पंढरपूर महिला अध्यक्ष संगीताताई माने, युवती शहर अध्यक्ष हर्षाली परचंडराव, महिला जिल्हाउपाध्यक्ष सरीकाताई साबळे, पंढरपूर शहर कार्याध्यक्ष सुनंदा उमाटे,पंढरपूर युवती तालुकाध्यक्ष ऋतुजा चव्हाण,पंढरपूर युवती शहर सचिव श्वेता देशपांडे, विध्यार्थी सेल च्या अमृता शेळके, शहर उपाध्यक्ष गिरीश चाकोते, शहर सचिव सचिन आदमीले, युवक तालुका अध्यक्ष संतोष चव्हाण,शहर संघटक दत्ता माने, विद्यार्थी जिल्हा सचिव सागर पडगळ, युवक शहर कार्याध्यक्ष विशाल सावंत, बापूराव कोले आदी उपस्थित होते.