लॉकडाऊनमध्ये कर्ज झाल्याने चोरली दुचाकी वाहने

लॉकडाऊनमध्ये कर्ज झाल्याने चोरली दुचाकी वाहने

दुचाकी चोरट्याला अटक

स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची कामगिरी

मोटार सायकल चोरी करणारा चोरटा जेरबंद

5 मोटार सायकलीसह 1,35,000 /- रूपये  किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने दुचाकी चोरट्यास अटक केली आहे. त्याच्याकडून पाच दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत.

दिनांक 08/10/2021 रोजी सायंकाळी 05ः30 वा चे सुमारास यातील फिर्यादी अजिनाथ वासुदेव कदम वय  54 वर्ष रा. रोपळे ता. पंढरपूर यांचा मुलगा तेजस हा त्याची वापरती सीडी डिलक्स मोटारसायकल नंबर एमएच 13 ए वाय 6292 ही रोपळे येथील स्टॅन्डवर लावून मित्राकडे गेला होता त्यानंतर तो परत रात्रौ 11ः30 वा. चे सुमारास बस स्टंडवर आला असता तेेंव्हा त्याची मोटारसायकल मिळून आली नाही म्हणून  अजिनाथ वासूदेव कदम यांनी अज्ञात चोरटयाविरूध्द फिर्याद दिल्याने पंढरपूर तालुका पोलीस ठाणे गुरनं 733/2021  भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. 

सोलापूर ग्रामीण जिल्हयातील वाढत्या मोटार सायकल चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध करून मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणून कारवाई करणेबाबत मा.पोलीस अधीक्षक, श्रीमती. तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक, श्री. हिम्मत जाधव, यांनी  स्थानिक गुन्हे षाखेचे पोलीस निरीक्षक, सर्जेराव पाटील यांना 
मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेशित केले होते. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील सहा.पोलीस निरीक्षक, रवींद्र मांजरेे यांचे पथकास सुचना दिले होते.

सहा.पोलीस निरीक्षक, रवींद्र मांजरेे व त्यांचे पथक हे मालाविषयीचे गुन्हयाचे उकल करणेकामी पेनूर गावात हजर असताना त्यांना गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,येवती ता. मोहोळ येथील राहणारा एक इसम हा रोपळे ता.पंढरपूर येथील बस स्टॅंडवरून चोरलेली डिलक्स मोटारसायकलसह पेनुर गावचे स्टॅंडवर थांबलेला आहे. अशा बातमीवरून संशईत इसमास मोटारसायकलसह ताब्यात घेवून त्याचेकडे मोटारसायकल कागदपत्राबाबत मागणी केली असता तो उडवाउडवीचे उत्तरे देवू लागला. त्यास अधिक विश्वासात घेवून  विचारपुस करता त्यांने सांगीतले की आज सुमारे तीन महिन्यापूर्वी रोपळे ता.पंढरपूर येथील बस स्टॅंडवर लावलेली मोटारसायकल रात्रीचेवेळी चोरून आणल्याचे सांगीतले.

सोलापूर ग्रामीण जिल्हयातील चोरीस गेलेल्या मोटारसायकलीबाबत त्यास विश्वासात घेवून विचारपूस करता त्याने की, मागील लाॅकडाउन च्या काळात कर्जबाजारी झालेने त्याने आष्टी ता.मोहोळ येथून 02 मोटारसायकली, येवती गावातून 01, मार्केटयार्ड पंढरपूर येथून 01, रोपळे ता. पंढरपूर असे एकूण 05 गाडया चोरल्याचे कबूल केल्याने त्याचेकडून  03 एचएफ डिलक्स, 02 स्प्लेंडर असे एकुण 05 मोटार सायकलीसह 1,35,000 रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपीस पंढरपूर तालुका पोलीस ठाणेकडील गुन्हयात अटक करण्यात आली असून त्याचेकडून आणखीण गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
नमुद आरोपी कडुन खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहे.* 
1 ) पंढरपूर तालुका 733/2021 भादवि 379 सीडी डिलक्स  मो. सा.
2) मोहोळ 107/2021 भादवि 379  स्प्लेंडर  मो. सा.
3)  मोहोळ 487/21 भादवि 379 स्प्लेंडर  प्रो मो.सा.
4)  मोहोळ आष्टी ता. मोहोळ येथून चोरलेली सीडी डिलक्स  मो. सा.
5)  पंढरपूर शहर 136/2021  भादवि 379 सीडी डिलक्स  मो. सा.

सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्रीमती. तेजस्वी सातपुते, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. हिंमत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली सहा. पोलीस  निरीक्षक श्री. रवींद्र मांजरे, सहा.पोलीस उपनिरीक्षक श्री.खाजा मुजावर, पोलीस अमंलदार/ नारायण गोलेकर, धनाजी गाडे,मोहन मनसावाले, सागर शिंदे, धनराज गायकवाड, अक्षय दळवी, चालक समीर शेख यांनी बजावली आहे.