युवकांनी मोठी स्वप्ने पाहून त्याचा पाठलाग करावा- डॉ. सुहासिनी शहा

युवकांनी मोठी स्वप्ने पाहून त्याचा पाठलाग करावा- डॉ. सुहासिनी शहा
ब्रह्मांड प्युअर व्हेज हॉटेल उदघाटनप्रसंगी प्रतिपादन
डॉ. सुहासिनी शहा, खासदार डॉ.जयसिद्धेश्वर स्वामी महाराज, श्री.अमोलराजे भोसले यांच्या हस्ते हॉटेलचे उदघाटन
सोलापूर (प्रतिनिधी): नुकतेच सोलापूरमधील 3 युवकांनी एकत्र येत एक आगळेवेगळे ब्रह्मांड प्युअर व्हेज रेस्टॉरंट सुरू केले आहे.  "वळसंग वाडा" या महाराष्ट्रातील प्रसिध्द हॉटेलचे जनक सिद्धेश्वर मोरे, मूळचे वळसंग येथील पण लंडन(इंग्लंड) येथे हॉटेल व्यावसायिक असणारे राज राठोड व भारताचे एव्हरेस्टवीर विश्वविक्रमवीर आनंद बनसोडे या तीन मित्रांनी एकत्र येत हॉटेल व्यवसायातील मानबिंदू असणारा "ब्रह्मांड" या ब्रॅण्डची निर्मिती केली आहे. 

ब्रह्मांड प्युअर व्हेज चे उदघाटन डॉ. सुहासिनी शहा मॅम(प्रिसीजन कॅमशाफ्ट), डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी (खासदार, सोलापूर), श्री. अमोलराजे भोसले (ट्रस्टी- स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट) यांच्या हस्ते व  श्री. महादेव कोगणुरे (फाउंडर- MK फाउंडेशन), श्री. सुखदेव भिसे-पाटील (बिजनेसमन, पुणे), श्री. नागेश इंदापुरे व श्री. नवनाथ इंदापुरे (बिजनेसमन, सोलापूर), श्री. संतोष भंडारे (आर्किटेक्ट) यांच्या प्रमुख उपस्थितीत 8 जुलै रोजी पार पडले.

जाहिरात 

" हॉटेल व्यवसाय सध्या खूपच वाईट अवस्थेत असून या व्यवसायात असणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणा देण्यासाठी आम्ही हॉटेल सुरू केले आहे. या काळात जर योग्य पाऊले उचलली तर नक्कीच येणारा काळ हा हॉटेल व्यवसायासाठी समृद्धीचा असेल. ब्रह्मांड मार्फत सोलापूरकरांना सर्वात वेगळ्या पदार्थांची मेजवानी देणार आहोत."

- सिद्धेश्वर मोरे (हॉटेल व्यावसायिक, प्रसिद्ध रेस्टॉरंट कन्सल्टंट)

"गेली 20 वर्ष लंडन मध्ये हॉटेल व्यवसाय केलेला आहे. आता सोलापूरात हॉटेल सुरू केले असून आमच्या "सिद्ध- राज कन्सल्टंसी" मार्फत हॉटेल व्यावसायिकांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे ट्रेनिंग देणार आहोत. ब्रह्मांड अंतर्गत आम्ही अनेकांना हॉटेल व्यवसायात जम बसवण्यासाठी मदत करणार आहोत" 
- राज राठोड ( हॉटेल व्यावसायिक, लंडन)