सेवानिवृत्तीच्या दिवशी सुखद धक्का 

सेवानिवृत्तीच्या दिवशी सुखद धक्का 

सोलापूर : पोलीस दलात काम करताना पदोन्नती मिळणे म्हणजे गौरवास्पद आहे. परंतु गेल्या दोन वर्षापासून रखडलेल्या पदोन्नतीमुळे हिरमोड झालेल्या हवालदाराला सेवानिवृत्तीच्या दिवशीच पदोन्नती देवून पोलीस उपायुक्त डॉ.दिपाली धाटे यांनी सुखद धक्काच दिला.

पोलीस हवालदार चंद्रकांत सिद्रामप्पा जकापुरे तब्बल 31 वर्ष सोलापूर शहर पोलीस दलात कार्यरत होते. सन 1991 मध्ये सोलापूर शहर पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून भरती झाले. त्यानंतर ते सलगरवस्ती, जेलरोड, जोडभावी पेठ, सदर बझार आणि फौजदार चावडी पोलीस ठाणे असे त्यांनी कर्तव्य बजावले तब्बल 31 वर्ष त्यांनी पोलीस शिपाई ते हवालदार असा प्रवास केला. पदोन्नती पासून ते वंचित राहिलेले होते त्यातच ते मंगळवार दि. 30 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. आणि सेवानिवृत्तीच्या दिवशीच त्यांना एक सुखद धक्का मिळाला. गेल्या दोन वर्षापासून त्यांच्यासह जवळपास 22 जणांची पदोन्नती रखडलेली होती. याबाबत त्यांनी पोलीस उपायुक्त डॉ.दिपाली धाटे यांच्याकडे याबाबत माहिती दिली आणि आपली अडचण मांडली त्यावर डॉ.धाटे यांनी तातडीने त्यांची सर्व माहिती संबधित ्नलार्कला मागितली आणि जे श्नय आहे ते त्यांनी तातडीने करून पोलीस हवालदार जक्कापुरे यांच्यासह इतर 6 जणांना पदोन्नती देण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे दिला अवघ्या काही तासातच सेवानिवृत्त होणारे चंद्रकांत जक्कापुरे यांना हवालदार म्हणून नव्हे तर सहाय्यक फौजदार म्हणून सेवानिवृत्त होण्याचा मान मिळवून दिला. त्याचबरोबर सध्या कार्यरत असलेले पोलीस हवालदार विजय रामचंद्र झाकणे, गोवर्धन घगनसिंग परदेशी, रफिक इब्राहीम मुल्ला, नईम अख्तर कडेचुर, विलास सुभाष पवार यांनाही पदोन्नती देवून सहाय्यक फौजदार करण्यात आले. 

धाटे मॅडमच्या प्रयत्नाने निवृत्तीच्या दिवशी का होईना पदोन्नती मिळाली - जकापुरे

सोलापूर शहर पोलीस दलात काम करताना चांगले वाईट अनुभव आले परंतु प्रमाणिकपणा आणि कष्ट हे गुण कधी सोडले नाही त्यामुळेच शेवट गोड म्हणजेच सेवानिवृत्तीच्या दिवशी पदोन्नती मिळाली. पोलीस उपायुक्त डॉ.दिपाली धाटे मॅडम यांनी जे केले ते कधीच विसरणार नाही त्यांनी कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या सोडवल्या आहेत. त्यांच्यामुळेच पदोन्नती मिळाली असे सहाय्यक फौजदार जकापुरे यांनी सांगितले.