दुचाकीला पर्स लावून कपडे खरेदीसाठी गेल्या अन्...

दुचाकीला पर्स लावून कपडे खरेदीसाठी गेल्या अन्...

गुन्हे शाखेची कामगिरी; शहरात झालेले तीन चोरीचे गुन्हे आणले उघडकीस

सोलापूर : बसस्थानकावर 22 ऑक्टोबर रोजी भाग्यश्री सचिन वेताळ (सिंहगड रोड, पुणे) या महिलेचे साडेसात तोळे सोने, पंधरा तोळे चांदीचे दागिने आणि मोबाइलची चोरी झाली होती. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चोरी उघडकीस आणली असून, दागिने जप्त केलेत. सतीश दत्ता जाधव (वय 26, रा. सेटलमेंट कॉलनी, सोलापूर) याला अटक केली आहे. 

सौ. वेताळ यांची आई मुरूम येथे राहतात. त्यांना भेटण्यासाठी जात होत्या. स्वच्छतागृहात जाऊन येईपर्यंत मुलाजवळ दिलेल्या पिशवीतील दागिने पळवले होते. पोलिस माहिती काढत असताना सतीश जाधव याचे नाव समोर आले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर गुन्ह्याची कबुली दिली. दागिने, मोबाइल जप्त केला.
सहायक आयुक्त अभय डोंगरे, निरीक्षक संजय जगताप, सहायक निरीक्षक ऋषिकेश पवळ, अजित कुंभार, यांच्यासह हवालदार बाबर कोतवाल, राकेश पाटील, संतोष फुटाणे, विजय वाळके, संदीप जावळे, विनायक बर्डे, वसंत माने, सचिन बाबर, उमेश सावंत, स्वप्नील कसगावडे, समर्थ शेळवणे, आरती यादव, आयेशा फुलारे, संजय काकडे, विजय निंबाळकर या पथकाने कारवाई केली.

बसस्थानकावरील चोरी, नवी पेठेतील पर्स आणि हैदराबाद रस्त्यावर रिक्षात मोबाइल चोरी अशा तीन चोरीच्या घटना उघडकीस आणल्या. यात दहा तोळे सोने, 18 तोळे चांदी चार मोबाइल जप्त करण्यात आला. तसेच चार आरोपींना अटक करण्यात आली.नवी पेठेत पर्सची चोरीनवी पेठेत मागील आठवड्यात विवेक मॅचिंग सेंटर समोर दुचाकीला पर्स लावून कपडे खरेदी करताना पर्सची चोरी झाली होती. संशयित ओंकार कल्याणी चाकोते (वय 35, रा. उत्तर कसबा, सोलापूर) याला अटक झाली आहे. 48 ग्रॅम सोने आणि मोबाइल जप्त केले. ही माहिती सहायक निरीक्षक अजित कुंभार यांनी दिली.माने, सचिन बाबर, उमेश सावंत, स्वप्नील कसगावडे, समर्थ शेळवणे, आरती यादव, आयेशा फुलारे, संजय काकडे, विजय निंबाळकर या पथकाने कारवाई केली.

बसस्थानकावरील चोरी, नवी पेठेतील पर्स आणि हैदराबाद रस्त्यावर रिक्षात मोबाइल चोरी अशा तीन चोरीच्या घटना उघडकीस आणल्या. यात दहा तोळे सोने, 18 तोळे चांदी चार मोबाइल जप्त करण्यात आला. तसेच चार आरोपींना अटक करण्यात आली.रिक्षात महिलेच्या पिशवीतून मोबाइल चोरीहैदराबाद रोड ते मार्केट यार्ड यादरम्यान रिक्षातून प्रवास करताना महिलेच्या पिशवीतून मोबाइल चोरी झाली होती. यातील संशयित लक्ष्मी शिवाजी भोसले (वय 27, रा. साईनाथ नगर, मुळेगाव रोड) याला अटक झाली आहे. भोसलेसोबत आणखी एक महिला सहकारी आहे. यांनी चोरलेला मोबाइल महमद आलम रफीक कुरेशी (वय 26, रा. एमआयडीसी परिसर) याने विकत घेतल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.