आम्ही पोलिस आहोत, विश्वास नसेल तर...

आम्ही पोलिस आहोत, विश्वास नसेल तर...

crime news in solapur

सोलापूर : पोलिस आहोत असे सांगून सर्वसामान्यांची लुट केल्याच्या घटना आजवर अनेकदा घडल्या आहेत. अशीच एक घटना दोन दिवसांपूर्वी म्हणजेच सोमवारी रात्री घडली. 

आम्ही पोलिस आहोत, विश्वास नसेल तर 100 नंबरला फोन करून विचारून घे, असे म्हणत दरवाजावर जोरजोरात लाथा मारून घरात घुसणार्‍या दोघांविरुद्ध विजापूर नाका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. मयुर दिगंबर तळभंडारे, महेंद्र श्रीहरी तळभंडारे (सर्व रा. मिलिंद नगर, बुधवार पेठ) असे आरोपींची नावे आहेत. फिर्यादी राजेश रामचंद्र पवार (वय 31, रा. अनुपम पार्क, विजापूर रोड) यांच्या घरी देवकार्य असल्याने घरातील इतर सदस्य बाहेर गावी गेले होते.

घरात राजेश पवार व त्यांची भाची दोघेच होते. दोघा जणांनी घराच्या मुख्य दरवाज्याजवळ उभे राहून दरवाजावर जोरजोरात लाथा मारून घराचा दरवाजा तोडून घरात घुसण्याच्या प्रयत्न केला. तुम्ही कोण आहात, असे विचारल्यानंतर पोलिस असल्याची बतावणी केली. 100 नंबरला फोन लावताना एकाने खिडकीतून हात टाकून मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केला. नंतर दोघे निघून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.