पती-पत्नीला बांबूने मारहाण! वाचा काय झाले..

पती-पत्नीला बांबूने मारहाण! वाचा काय झाले..

सोलापूर  : घरासमोर गाडी लावण्याच्या कारणावरून पती-पत्नीस शिवीगाळ करून बांबूने मारहाण केल्याची घटना दि.३ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास धोत्रेकर वस्ती भवानी पेठ सोलापूर येथे घडली.

याप्रकरणी लक्ष्मीबाई नागेंद्र गोरकल (वय-५५,रा.धोत्रेकर वस्ती,भवानी पेठ, सोलापूर) यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.त्यांच्या फिर्यादीवरून सिद्धू शंकर करली,सिद्धार्थ सिद्धू करली,रेखा सिद्धू करली, शिवा शंकर करली,अंबादास शंकर करली,हनमंतव्वा शंकर करली व अंबिका (सर्व.रा.धोत्रेकर वस्ती,सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की,फिर्यादी यांचे पती नागेंद्र हे सिद्धू यास त्यांची मोटरसायकल काढण्यास सांगत असताना त्यांच्या दोघात वाद झाला.त्यानंतर फिर्यादी हे वाद मिटवण्या करिता मध्ये गेले असता,सिद्धू याने त्याच्या घरात जाऊन लाकडी बांबू घेऊन फिर्यादी लक्ष्मीबाई व त्यांचे पती नागेंद्र यांना बांबूने मारहाण केली.त्यावेळी फिर्यादी यांचा मुलगा अंबादास भांडण सोडण्यास आला असता,सिद्धार्थ व त्याची पत्नी रेखा,सिद्धू करली याची बहिण आंबीका,शिवाशंकर करली व हनमंतव्वा शंकर करली यांनी देखील हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.असे फिर्यादीत म्हटले आहे.या घटनेची नोंद जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात झाली असून,या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक मनोहर हे करीत आहेत.