लग्नानंतर म्हणाले तुझ्यामुळे घरात दरिद्री आली..! वाचा पुढे काय झाले..

लग्नानंतर म्हणाले तुझ्यामुळे घरात दरिद्री आली..! वाचा पुढे काय झाले..

सोलापूर : माहेरहून पैसे आणले नाही यावरून सासरी छळ केल्याप्रकरणी राणी तानाजी पुकळे (रा. काळेवाडी, घेरडी, सांगोला सध्या - सर्वोदयनगर मुळेगाव रोड) यांनी एमआयडीसी पोलिसात सासर्‍याच्या लोकांविरोधात फिर्याद दिली आहे. 

तानाजी पुकळे, अकुताई पुकळे, प्रियंका गावडे, चंद्रकांत गावडे, शहाजी पुकळे, भाऊ पुकळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 30 मे 2020 पासून हा प्रकार घडला आहे. लग्न झाल्यानंतर चारच महिन्यात सगळ्यांनी मिळून राणी पुकळे यांना पैसे आण म्हणून त्रास देऊ लागले. एकटीलाच घरातली कामे लावणे, स्वयंपाक येत नाही म्हणून त्रास देणे. तुझ्यामुळे घरात दरिद्री आली, आमचा मानपान व्यवस्थित केला नाही यावरून त्रास देत होते. नेहमी मारहाण केली. शारीरिक व मानसिक छळ केला आहे, असे फिर्यादीमध्ये म्हटले आहे.

उपाशी ठेवून मानसिक व शारीरिक छळ
सोलापूर : कर्ज फेडण्यासाठी तुझे सोने विकून पैसे दे, माहेरून पैसे घेऊन ये असे म्हणून विवाहितेचा छळ केला. छळाला कंटाळून तरुणीने पतीसह चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात फिर्याद दिली आहे. फातिमा मजहर शेरदी (वय 20, रा. सरवदेनगर मुळेगाव रोड ) यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली आहे. पती मजहर इरफान शेरदी, इरफान शेरदी ( सासरा ), शहनाज शेरदी (सासू ), अजहर शेरदी ( दीर) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 19 फेब्रुवारी 2021 पासून हा प्रकार सुरू होता. फातिमा शेरदी यांना लग्न झाल्यापासून काही दिवसातच तुला लग्नामध्ये मानपान केला नाही. तुम्ही भगोडे आहात असे म्हणून मारहाण करणे. उपाशी ठेवून मानसिक व शारीरिक छळ केला. माहेरहून पैसे येऊन ये म्हणून त्रास देत होते, असे फिर्यादीमध्ये म्हटले आहे.