गांजा पिण्यासाठी मुलाने घातला बापाच्या डोक्यात कोयता!

गांजा पिण्यासाठी मुलाने घातला बापाच्या डोक्यात कोयता!

सोलापूर : गांजा पिण्यासाठी पैसे मागून शिवीगाळ केल्याप्रकरणी मुलानेच बापाच्या डोक्यात कोयता घालून गंभीर जखमी केल्याची घटना दि.८ ऑक्टोंबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घोंगडे वस्ती,भवानी पेठ,इंदिरा वसाहत,सोलापूर येथे घडली.

याप्रकरणी रोहित रेवन शिरसागर (वय-१९,रा.सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी रेवन मारुती शिरसागर (वय-४२,रा.घोंगडे वस्ती भवानी पेठ,इंदिरा वसाहत,सोलापूर) हे घरी झोपले असताना त्यांचा मुलगा घरी आला व फिर्यादीच्या पत्नीला मला गांजा पिण्यासाठी तीस रुपये दे असे मनाला.त्यावेळी फिर्यादी रेवन शिरसागर यांना जाग आली.त्यावेळी फिर्यादीचा मुलगा रोहित हा फिर्यादीच्या पत्नीसोबत पैशासाठी वाद घालताना दिसला.त्यावेळी फिर्यादीच्या पत्नीने रोहीत याला शंभर रुपये दिले व पैशाच्या कारणावरून रोहीतने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.फिर्यादी रेवन शिरसागर यांनी आरोपी रोहित याला समजून सांगत असताना रोहित याने रेवन शिरसागर यांच्या तोंडावर बुक्क्यांनी मारहाण करून घरात असलेला लोखंडी कोयता डोक्यात मारून गंभीर जखमी केले.असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.या घटनेची नोंद जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात झाली असून,या घटनेचा पुढील तपास पोसई बोराडे हे करीत आहेत.