कमी दरात सोने देतो म्हणून बोलाविले अन् मग..

कमी दरात सोने देतो म्हणून बोलाविले अन् मग..

सोलापूर : मंद्रुप पोलीस ठाणेच्या हद्दीत कमी दरात सोने देतो असा बहाणा करून मारहाण केलेल्या दरोडयाच्या गुन्हयाची उकल करण्यात आली आहे. 

श्री.राहुल दत्तात्रय भवाळ (रा.काळेगाव तुळजापूर जि.उस्मानाबाद सध्या कसपटटेवस्ती वाकड पुणे ) हे दिनांक   01.10.2020 रोजी सायंकाळी 06.30 वा. त्याचे मित्र सतीश उगले, नागेश भवाळ, शंभु उकरंडे, विष्णु भवाळ व संतोष सुर्यवंशी याचेसह त्याचे स्वीप्ट कार मधुन त्याचे ओळखीचा मल्लेश माने याचे सांगणेवरून कमी दरात सोने देतो असे सांगितल्याने मौजे अंत्रोळी गावाजवळील द्राक्ष बागेजवळ गेले असता तेथे मल्लेश माने व इतर 9 अनोळखी इसमानी त्यांना कमी भावात सोने देण्याच्या बहाणा करून तलवारी सारख्या लोखंडी हत्याराने मारून त्याचेकडील 11 हजार रोख रक्कम व 3 मोबाईल 15 हजार रूपये असा एकूण 26 हजार 100 रूपये किंमतीचा मुद्देमाल काढुन घेतला. त्याबाबत मंद्रुप पोलीस ठाणेस गुरनं 301/2020 भादंवि कलम 395,397 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्हयाचा तपास सपोनि नितीन थेटे, मंद्रुप पोलीस ठाणे हे करीत  आहेत, त्यांनी गुन्हयाची उकल 24 तासाचे आत करून आरोपी मल्लीकर्जुन (1) मारूती बजेंत्री उर्फ मल्लेश माने (2) मल्लप्पा धईराम भुई (रा.उमराणी टाकळी ता.चडचण जि.विजयपुर कर्नाटक ) यांना दिनांक 03.10.2020 रोजी अटक करून गुन्हयात वापरलेली 30 हजार रूपये किंमतीची होडा कंपनीची शाईन मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे. दोन्ही आरोपी यांना न्यायालयात हजर केले असता त्यांची दिनांक 07.10.2020 रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड सुनावली असून उर्वरित आरोपी यांचा शोध चालु आहे.