धर्मवीर संभाजी महाराज तलाव बनले सुसाईड पॉईंट!

धर्मवीर संभाजी महाराज तलाव बनले सुसाईड पॉईंट!

संभाजी ब्रिगेडने फलक लावून वेधले लक्ष 

सोलापूर : विजापूर रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज तलाव येथे गेल्या काही दिवसांपासून अनेकजणांनी वेगवेगळ्या कारणांमुळे आत्महत्या केल्यामुळे हा तलाव आत्महत्या करण्याचे केंद्र (suicide point) बनत चालले आहे. त्यामुळे या तलावाजवळ संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष श्याम कदम यांच्या नेतृत्वाखाली आत्महत्या केंद्र असे फलक लावून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले.

संभाजी ब्रिगेड संघटनेच्या वतीने गेल्या तीन-चार वर्षांपासून विजापूर रोड येथील छत्रपतीसंभाजीमहाराज तलाव सुशोभीकरण करण्याकरिता शासनाकडे व सोलापूर महानगरपालिकेला निवेदन देऊन सातत्याने पाठपुरावा करण्यात आल्यामुळे सुशोभीकरण चे काम सुरू झाले परंतु संथ गतीने चालू झालेले काम महानगरपालिकेच्या उदासीन धोरणामुळे व दुर्लक्षामुळे या तलावात मागील काही महिन्यापासून वैयक्तिक विविध कारणाने शहरातील अनेक नागरिक आत्महत्या केले आहेत तर काही जण आत्महत्येचा प्रयत्न करीत आहेत सध्या तलावातील गाळ काढण्याचे काम गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहे नयनरम्य पर्यटनस्थळ असलेल्या छत्रपती संभाजी महाराज तलावाच्या चारही बाजूने संरक्षक भिंत उभी करून त्या ठिकाणी कायमस्वरूपी दोन गार्डची नेमणूक करावी अशी मागणी सातत्याने संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली होती पण महानगर पालिकेच्या दुर्लक्षामुळे हे ठिकाण म्हणजे आत्महत्या केंद्र बनले आहे  त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने महानगरपालिकेची लक्ष वेधण्यासाठी तलाव परिसरात आत्महत्या केंद्र  म्हणून प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. 

यावेळी संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष श्याम कदम, महिला जिल्हाध्यक्ष  जगदाळे, संभाजी ब्रिगेड कार्याध्यक्ष अरविंद शेळके, सिताराम बाबर, संजय भोसले, महेश बिराजदार, दत्ता जाधव, महेश तेलुर, दत्ता पवार, महेश माने, गगन कणबस, राहुल घोडके,  इलियास शेख, कल्लाप्पा घंटे उपस्थित होते.