डॉ. मेतन यांच्या छायाचित्रांचे बेंगलोरमध्ये प्रदर्शन

डॉ. मेतन यांच्या छायाचित्रांचे बेंगलोरमध्ये प्रदर्शन

निसर्गाशी नाती जुळवा संकल्पनेवर केली मांडणी

सोलापूर : व्ही मेतन क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून "निसर्गाशी नाती जुळवा" ही संकल्पना घेऊन डॉ. व्यंकटेश मेतन यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन बेंगलोर येथील प्रसिद्ध कर्नाटक चित्रकला परिषद येथे आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री गोविंदजी करजोळ यांच्या हस्ते करण्यात आले. 

उद्घाटनाच्या प्रसंगी जितो फाउंडेशनचे चेअरमन अशोक नागोरी, जितो वुमन विंगचे चेअरमन अनिता फिरवाल, सिनेअभिनेता रुपेश कुमार, ज्येष्ठ पत्रकार अभय दिवाणजी, महावीर मेहता हे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री यांनी कला दालनात ठेवलेल्या छायाचित्रांच्या कलेचे कौतुक केले. सर्व छायाचित्रे निसर्गाच्या विषयी आकर्षण निर्माण करणारे आहेत असे संबोधले. या प्रदर्शनामध्ये एकूण १२० छायाचित्रे टांगलेली असून त्यामध्ये ३० छायाचित्रे ही सोलापुरातील वन्यजीवन व स्मारकांची आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सिद्धेश्वर मंदिर, पंढरपूर येथील विष्णुपद, सोलापुरातील पक्षी व वन्यजीव आहेत. या प्रदर्शनामध्ये पक्षी, प्राणी, निसर्ग, लँडस्केप व ऐतिहासिक स्मारकांची छायाचित्रे लावलेले आहेत. या प्रदर्शनाचे आकर्षण प्रत्येक छायाचित्राखाली लिहिलेली माहिती व संदेश हे असून त्याचे कौतुक होत आहे. 

कार्यक्रमाचे उद्घाटनप्रसंगी सोलापुरातील व बेंगलोर येथील अनेक मंडळी उपस्थित होते. या प्रदर्शनातील छायाचित्रे विक्रीसाठी उपलब्ध असून त्यातून जमा झालेली रक्कम ही डॉ. मेतन फाउंडेशन आयोजित सामाजिक कार्यासाठी वापरली जाईल, असे डॉ. मेतन यांनी सांगितले.