स्वर्गात गेल्याचा अनुभव! अविस्मरणीय भीमाशंकर जंगल ट्रेक

स्वर्गात गेल्याचा अनुभव! अविस्मरणीय भीमाशंकर जंगल ट्रेक

ट्रेक म्हंटले की, इको फ्रेंडली क्लब आणि इको फ्रेंडली क्लब म्हंटले की श्री परशुराम कोकणे सर हे गणितच झालाय. असेच एक ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजीचा भिमाशंकर ते भोरगिरी रेंज ट्रेक !

या पूर्वी सुद्धा इको फ्रेंडली क्लब सोबत अनेक ट्रेक केले पण यावेळेचा अनुभव खूपच वेगळा आणि उत्साहवर्धक होता. ट्रेकला निघताना जेवढा आनंद होता त्यापेक्षा दुपट्टीने आनंद या दोन दिवसात अनुभवायला मिळाला. सर्वप्रथम मी श्री. परशुराम कोकणे सरांचा आभार मानतो की, सदर ट्रेक २५ व २६ ऑगस्ट रोजी आयोजित केला होता. मला परिवारासह ट्रेकला यायचे आहे सदर कालावधीत मुलाचे परीक्षा असल्याने ट्रेकचा तारीख बदलता येईल का अशी विनंती केलो तर लगेच सरानी बघतो म्हणून सांगितले व दुसऱ्या  दिवशी लगेच सरांचा फोन आला व ट्रेक ची तारीख ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर अशी केली आहे सांगितले. पण काही घरगुती अडचणी मुळे शेवटी परिवारासह येता आलेच नाही. 


ट्रेक बद्दल अनुभव सांगायचे म्हंटले तर खूपच अविस्मरणीय असा ट्रेक होता. त्यात श्रावण महिना असल्याने १२ ज्योतीर्लिग पैकी एक असलेल्या श्री भिमाशंकर चे दर्शन होणार (मी थोडा देवभक्त आहे ) यामुळे मी खूप आनंदी होतो. कधी एकदा पोहोचतो असे वाटत होते. पहाटे एकदाचे पोहोचले मग मुक्कामची व्यवस्था महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या भीमाशंकर रिसॉर्ट येथेअतिशय उत्तम अशी होती. आंघोळ नाश्ता आटपून भिमाशंकर मंदिराकडे निघालो मी सोलापूर हून येतानाच १०८ बेल व फुले सोबत आणले होते पण मंदिरात दर्शनासाठी सोडत नाहीत असे कळताच थोडासा निराश झालो. तेथील बंदोबस्तावर असलेल्या पोलिस कर्मचारी यांना विनंती केल्यानंतर त्यांनी थोडासा लांबूनच दर्शन घेण्याची परवानगी दिली. त्यामुळे मी सोबत नेलेले बेल व फुले महादेवाला अर्पण करण्याची संधी मिळाल्याचा आनंद वेगळाच होता. तेथून ट्रेकला सुरवात झाली स्थानिक गाईड श्री स्वप्नील शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली. वरून धो-धो पडणारा पाऊस,सर्वत्र पसरलेला हिरवागार गालिचा,थंड व संथ गतीने वाहणारा आल्हाददायक वारा याचा अनुभव घेत एकूण ४५ जण निघालो. अगदी स्वर्गात गेल्यासारखे वाटत होते.जंगलातून वाट काढत श्री छत्रपती शिवाजी महाराज,शिवयोगी सिद्धरमेश्वर महाराज की जय च्या जयघोषात निघालो.  पहिल्या दिवशीच्या ट्रेकमध्ये कपडे,बूट भिजले, खूप दिवसांनी ट्रेक करत असल्याने पाय चांगलेच ठणकत होते, पण म्हटलं चलो ये भी ठीक है..! स्वर्ग पाहायचा म्हटल्यावर काहीतरी सहन केलंच पाहिजे की..आयुष्यात कधी-कधी माणसाला अनपेक्षितरित्या मनाला आनंद देणारे क्षण अनुभवाला येतात तसाच आनंद या ट्रेक मुळे मिळाला.श्री. परशुराम कोकणे सर व अजित कोकणे सर त्यांच्या नियोजनात व्यस्त असणार इको फ्रेंडलीचा हीरो अभिषेक सोडल तर कोणीच नव्हते.मी रोज ग्रुप चेक करणार कोणी परिचयाचे येत आहेत का? पण कोणीच नाही. पण बस मध्ये बसल्यावर माझ्या बाजूला असलेले श्री. भोसले सरकार यांची ओळख झाली १० मिनिटातच मैत्री झाली लगेच माझे फेसबूक फ्रेंड असलेले श्री .विवेक वाले सर त्यांचे मित्र श्री दिनेश गजभार सर व डॉ. राघवेंद्र नादारगी सर यांच्याशी मैत्री कधी झाली कळालेचे नाही अगदी खूप वर्षापासून मैत्री असल्यासारखे वाटत होते.  अनोळखी लोकांशी नव्याने परिचय होतो आणि जीवन अधिक समृद्ध होऊन जातं..! पाहिल्याच दिवशी जवळपास १५ किलोमीटरचा प्रवास झाला. प्रवासादरम्यान कुठे दरी,कुठे सपाट भाग,कुठे दगडावरून  जाणे,मधूनच घनदाट जंगल, पावसामुळे निसरडा झालेला रस्ता वरून पडणारा पाऊस अंगावरील कपडे,बूट पुर्णपणे भिजून गेले होते. आश्याच अवस्थेत एकमेकांना धीर देत,एकमेकांचे सहकार्य घेत १५ किलो मीटरचा जंगल ट्रेक पार केला व मुक्कामच्या ठिकाणी पोहोचलो. इतके थकून गेलो होतो की विचारूच नका. त्या दिवशीचा रात्रीचा जेवणाचा मेनू एकदम मस्त होता त्यामुळे थोडासा थकवा दूर झाला. रात्री झोपी गेलो दिवसभर थकल्यामुळे कधी झोप लागली कळालेच नाही पण ट्रेक मध्ये सर्वांना हसवणारे व सर्वांचा थकवा दूर करणारे हुरहुन्नरी व्यक्तिमत्व असलेले डॉक्टर श्री संतोष तडवळकर यांच्यामुळे झोपच उडून गेली. सकाळी उठल्यानंतर मसाज करून रात्री दिलेल्या त्रासाचा कसर भरून काढला विशेष सांगायचे म्हंटलं तर दुसऱ्या  दिवसाचे ट्रेक करू का नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती पण डॉक्टर श्री संतोष तडवळकर यांनी केलेल्या मसाज मुळे दुसऱ्या  दिवसाचे ट्रेक यशस्वी रित्या पूर्ण केलो. दूसरा दिवस भोरगिरी गड चडण्याचा सकाळचे नाश्ता व चहा आटपून गड चडण्यास निघालो थोडा अंतर चालल्यावर नदीच्या पत्रातून वाहणार्याग पाण्याचा ओढा लागला दिवस व रात्रभर पाऊस झाल्यामुळे पाण्याचा प्रवाह जोरात होता. प्रवाह पाहून पुढे जावे का नको असा विचार मनात येत होता. तेथे सुद्धा संतोष तडवळकर यांनी सर्वात आगोदर जावून तश्या प्रवाहात सुद्धा नाचत होते ते पाहून सर्वांच्या मनातील भीती दूर झाली व सर्वांनी साखळी करून एकमेकांना सहकार्य करत ओढा पार केला. भोरगिरी गड चडण्यास अवघड नव्हता पण उंचीवर असल्याने तेथून निसर्ग पाहण्याचा अनुभव काही वेगळाच होता. अगदी मन प्रसन्न झाले. जणू स्वर्गात असल्यासारखे वाटत होते.

गड उतरल्यानंतर मस्त गरमागरम जेवण घेतलो. मग मिनी देवकुंड धबधबा कडे निघालो. जवळपास 2 ते 3 किलोमीटर लांब जंगल,दरी झाडीझुड्प्यातून वाट काढत पोहोचलो.धबधबा पाहून अगदी सगळा थकवा निघून गेला. सर्वांनी मनसोक्त भिजत,नाचत धबधब्याचा आनंद घेतला. संध्याकाळच्या चहा नंतर परतण्याची इच्छा नसताना सोलापूर कडे मार्गस्त झालो. ट्रेक दरम्यान श्री. विवेक वाले सरांकडून फोटोग्राफी कशी करावी याबद्दल उपयुक्त माहिती मिळाली त्याबद्दल त्यांचे आभार. त्याच प्रमाणे श्री. दिनेश गजभार सर,भोसले सरकार व डॉ. राघवेंद्र नादारगी यांच्या सारखे नवीन सोबती मिळाले त्याबद्दल त्यांचेही आभार. सर्वात महत्वाचे म्हणजे ट्रेक चे आयोजक श्री. परशुराम कोकणे सर व ट्रेक चे अगदी काटेकोर नियोजन करणारे श्री अजित कोकणे सर यांनी तब्बल 50 जणांना एका कुटुंबा प्रमाणे एकत्रित ठेवून कोणालाही कोणत्याही प्रकारचे त्रास न होता ट्रेक यशस्वी रित्या पूर्ण केल्या बद्दल व संतोष तडवळकर यांनी सर्वांच्या चेहर्याहवर हास्य शेवट पर्यन्त टिकवून ठेवल्याबद्दल त्यांचेही आभार!!!!!!
- श्री. प्रकाश आळंगे