पर्यावरणस्नेही सोलापूरकरांचा सन्मान !

पर्यावरणस्नेही सोलापूरकरांचा सन्मान !

माझी वसुंधरा अभियान अंतर्गत इको फ्रेंडली क्‍लब आणि महापालिका पर्यावरण विभागाचा उपक्रम

सोलापूर : माझी वसुंधरा अभियान अंतर्गत इको फ्रेंडली क्‍लब आणि सोलापूर महानगरपालिका पर्यावरण विभाग यांच्यावतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केलेल्या नागरिकांचा रविवारी पर्यावरणस्नेही सोलापूरकर म्हणून सन्मान करण्यात आला. भैय्या चौकातील डॉ. द्वारकानाथ कोटणीस स्मारक या ठिकाणी हा कार्यक्रम झाला. 

शिवचरित्र व्याख्याते, हिंदवी परिवाराचे संस्थापक डॉ. शिवरत्न शेटे, सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे, हॅपी टू हेल्प फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मदन पोलके, एबीपी माझाचे इव्हेंट हेड राजकुमार शास्त्री, रॉबिन हूड आर्मीचे हिंदुराव गोरे यांच्या हस्ते सन्मानपत्र, माझी वसुंधरा अभियानाचा संदेश असलेली कापडी पिशवी आणि रोप भेट देऊन गौरविण्यात आले. यावेळी मंचावर सोलापूर महापालिका पर्यावरण अधिकारी स्वप्नील सोलनकर, उद्यान अधिक्षक शशिकांत कांबळे, इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक परशुराम कोकणे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन दीप्ती इंगळे - सिद्धम यांनी केले.

महानगरपालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी उपस्थितांशी साधलेला संवाद - पहा व्हिडीओ