#माझीJourney : जाणून घेऊया श्री. मिलिंद भोसले यांचा आजवरचा प्रवास...

#माझीJourney : जाणून घेऊया श्री. मिलिंद भोसले यांचा आजवरचा प्रवास...

सोलापूर : राज्य कंत्राटदार संघटना व राज्य अभियंता संघटनेचे अध्यक्ष, वेक अप सोलापूर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष इंजि. मिलिंद भोसले यांच्याशी स्मार्ट सोलापूरकर डिजीटल मिडीया पोर्टलचे संपादक परशुराम कोकणे यांनी #माझीJourney या कार्यक्रमात साधलेला हा प्रेरणादायी संवाद सर्वांनीच पाहायला हवा..
आजच्या अभियंता दिनानिमित्त ही मुलाखत आपल्यासर्वांसमोर पुन्हा एकदा सादर करत आहोत.

मा मिलिंदजी भोसले हे कार्यतत्पर, यशस्वी उद्योजक,हजारो लोकांचे संसार उभे करणारा जनसामान्यांचा मनातील संयमी ,खंबीर ,दिलदार राज्यातील नेतृत्व
आज राज्यातील जवळपास सर्वच क्षेत्रात आपल्या स्वतच्या कामाने ,कार्याने,कर्माने जनसामान्य पर्यत पोहचलेले नेतृत्व जवळपास ,सर्व संघटनेचे राज्यस्तरीय अध्यक्षपद भुषविणारे मिलिंदजी हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून राज्यभर सर्वच क्षेत्रात ओळखले जाते 
एक सामान्य कुटुंबात जन्मलेल्या पण आपल्या कामाने, जनमानसात व उभ्या महाराष्ट्रात एक उत्तुंग यशाची ,कर्तृत्वाची कमान कमी कालावधीत कोणालाही न दुखवता,कुणाचेही न ओरबडता,कुणाचेही न मानहानी करता, प्रंचड उंचीवर नेण्यास यशस्वी झाले आहे ही म्हणावी तितकी सोपी गोष्ट नाही
परंतु एक मान्य करावे लागेल की हे करण्यासाठी प्रंचड दिवसरात्र मेहनत,काम, व पाठपुरावा,आणि पडेल ती किंमत मोजायची मनाची तयारी,स्वार्थ साधण्यासाठी कधीही पुढे नाही, इतरांसाठी केलेल्या कामात आनंद मानणारे, दुसऱ्या ला सुखात ठेवण्यासाठी स्वताचे आयुष्य वेचणारे असे मिलिंदजी बद्दल लिहण्यास हे शब्दांकन फारच तोडकेच आहे
परंतु त्यांनी सर्वच बाबतीत व सर्व क्षेत्रात अध्यक्ष या शब्दास न्याय दिला आहे यामुळे सर्व लहान,मोठी,थोर विचारवंत जनता ही त्यांना अध्यक्ष म्हणूनच संबोधतात  यातच त्यांच्या गुणांची,स्वभावाची,कर्माची,कार्याची,मनाची,कामांची गुणसूत्र जनतेनी व्यवस्थित पणे जुळवळलेली दिसत आहे यातुनच सकारात्मकता  
उर्जा त्यांच्या नावातच दिसत आहे   
१)महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना
२) महाराष्ट्र राज्य कंस्ट्रक्शन फोरम
३) महाराष्ट्र राज्य स्वंयरोजगार सहकारी सेवा संस्था
४) महाराष्ट्र राज्य सुशिक्षित बेरोजगार प्रतिष्ठान
५)राज्य स़ंचालक महाराष्ट्र राज्य सांबा विभाग शासन‌ दरसुची समिती
६)  संंथ्पापक अध्यक्ष वेक अप सोलापूर फाउंडेशन
७) उपाध्यक्ष कविता अर्बन बँक सोलापूर