हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनचा 5500 वृक्षलागवडीचा संकल्प

हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनचा 5500 वृक्षलागवडीचा संकल्प

सोलापूर : २६ जुलै कारगिल युद्धात शहीद झालेल्या ५५० जवानांच्या स्मृती चिरंतन जपण्यासाठी माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत सह्याद्री देवराई व हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पाच हजार पाचशे वृक्ष महानगरपालिका सोलापूर यांना देण्याचा संकल्प हाती घेतला आहे. 

या उपक्रमाचा शुभारंभ सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांच्या शुभहस्ते सोमवार दि.२६/०७/२०२१ रोजी जागृती विद्या मंदिर नेहरू नगर सोलापूर येथे करण्यात आला. फाऊंडेशनने ५५०० वृक्षलागवडीचा जो संकल्प हाती घेतला आहे. त्यातील २५०० वृक्षांचे नियोजन सध्या झालेले आहे. आणखी ३००० वृक्षांचे नियोजन फाउंडेशन सध्या करत आहे. हॅप्पी टू हेल्प फाउंडेशन करत असलेल्या कामाचे व आणलेल्या मोठ्या झाडांचे उपायुक्त धनराज पांडे यांनी कौतुक केले. लवकरच फाउंडेशनच्यावतीने देत असलेल्या झाडांची लागवड करण्यासाठीची जागा उपलब्ध करून देण्याची व इतर सर्व बाबींची जबाबदारी मी घेत आहे असा शब्द उपयुक्त धनराज पांडे यांनी दिला आहे.  यामुळे फाउंडेशनच्या सर्व सदस्यांचा उत्साह द्विगुणीत झाला आहे. धनराज पांडे यांच्या वृक्षारोपणाची सर्व जबाबदारी स्वीकारण्याच्या वृत्तीमुळेच सोलापूरमध्ये अनेक वृक्षप्रेमींना पाठबळ मिळत आहे. सोलापूर येथील वृक्षसंवर्धनाची चळवळ गतीमान होत आहे. त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात आपले सोलापूर शहर प्रदुषणमुक्त,सुंदर व हरित  होईल यात शंका नाही, अशी भावना हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष मदन पोलके यांनी व्यक्त केली आहे.

यावेळी फाऊंडेशनचे सचिव सचिन शिंदे, कार्याध्यक्ष हिरा पवार, सहसचिव शिवाजी बुरांडे, फाउंडेशनचे समन्वयक श्री बिराजदार सर,सौ सविता नागुर-बिराजदार मॅडम, सौ पौर्णिमा पोलके, जयंत गायकवाड,सोमनाथ गायकवाड, युवराज खराडे,संकेत पोलके,परिणीता पोलके हे उपस्थित होते.