सायकलिंगचे दोनशे दिवस पुर्ण; ‘सायकल लवर्स’चे सेलिब्रेशन!

सायकलिंगचे दोनशे दिवस पुर्ण; ‘सायकल लवर्स’चे सेलिब्रेशन!

सोलापूर : स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूटचे प्राचार्य आणि सायकल लवर्स ग्रुपचे सदस्य हिंदुराव गोरे यांनी आज आपल्या सायकलींचे 200 दिवस पूर्ण केले आहे. आज सकाळी सायकल लवर्स ग्रुपने सोलापूर ते लांबोटी सायकलिंग राईड करून हिंदुराव गोरे यांच्या दोनशे दिवसाच्या सायकलींचे सेलिब्रेशन केले आहे.
--
प्राचार्य हिंदूराव गोरे यांची पोस्ट-

अब कि बार दोनशे पार...✌✌✌

बघता बघता आज सायकलिंगचे दोनशे दिवस पुर्ण झाले! 

खर तर सुरवातीला अगदी टाईमपास म्हणून सुरु केलेले सायकलिंग आज व्यसन बनले...मागे वळून पाहताना...

तसे तर मागे पाच ते सहा वेळा जिम ला पैसे भरुन न जाणे हा अनुभव माझ्यासाठी नविन नव्हता म्हणून पैसे घालून नविन सायकल घेण्याची डेरींग होत नव्हती पर्यायी डोंगरेश चाबुकस्वारची जुनी सायकल रिपेअर करुन घेतली आणि सलग तीन महिने सराव झाल्यानंतर लाॅकडाऊनमध्ये चहापाण्याच्या वाचलेल्या पैशातून नविन सायकल घेतली आणि तो प्रवास आज दोनशे दिवसांवर पोहचला. 

ह्या दोनशे दिवसांमध्ये ५,२६४ किमी इतके अंतर सायकलिंग केले कधी दररोज तर कधी संडे सायकल राईड असे करत करत आज दोनशे दिवस पुर्ण केले अगदी सुरवातीला ५,१०,१५,२०,३० नंतर ५०,१०० किमी अंतर सहज पार करत गेलो. आज माझा माझ्यावरच विश्वास बसत नाही पण शेवट पर्यंत सातत्य टिकवणे हे ध्येय ठेवलं होत आणि आता भविष्यात ही राहील. आज दोनशव्या राईड निमित्त लांबोटी येथे जाऊन एकुण ५८ किमी सायकलिंग केले व सेलिब्रेशन देखील केले सोबत महेश बिराजदार, डॉ प्रविण ननवरे, भावेश शहा, दादाराव इंगळे, प्रविण जवळकर, आनंद कोल्हापूरे, प्रदीप कदम, शिवाजी सुरवसे, बालाजी सुरवसे, प्रतापराव भोसले, डॉ हर्षवर्धन जोशी व सुनिल पवार आदी सहकारी उपस्थित होते. 

ह्या एकुण प्रवासामध्ये डॉ. अभिजीत वाघचवरे, डाॅ सत्यजित वाघचवरे, महेश बिराजदार, डॉ प्रविण ननवरे, अविनाश देवडकर, अमेय केत, आदित्य बालगावकर, प्रा. सारंग तारे, भाऊराव भोसले, शितल कोठारी व अनिकेत चनशेट्टी यांची मोलाची साथ लाभली. मधल्या काळातील विशेष आठवण म्हणजे माझा मित्र शिवराज केल्लुरकर यांनी नविन सायकल टी शर्ट भेट दिला व सोलापुरातील Yes News Marathi च्या विशेषांकामध्ये माझा सायकलिंग वरचा लेख प्रसिद्ध झाला. 

आज दोनशव्या राईड च्या निमित्ताने सोबत असणाऱ्या व सायकल लव्हर्स च्या सर्व सदस्यांचे सहकार्याबद्दल मनपूर्वक आभार. 

- हिंदुराव दिनकरराव गोरे