IAS सुनील केंद्रेकर यांचे व्हायरल फोटो तुम्ही पाहिले का?

IAS सुनील केंद्रेकर यांचे व्हायरल फोटो तुम्ही पाहिले का?

ias sunil kendrekar

सोलापूर : औरंगाबाद महसूल विभागाचे आयुक्त सुनील केंद्रेकर हे त्यांच्या कामासाठी जेवढे चर्चेत असतात तेवढेच त्यांच्या साधेपणासाठीही ओळखले जातात. सुनील केंद्रेकर हे त्यांच्या पत्नीसोबत भाजी खरेदी करायला गेले होते. त्यानंतर त्यांनी भाजीची पिशवी उचलून खांद्यावर घेतली. त्यांच्यासोबत कोणताही बॉडीगार्ड किंवा इतर कोणताही लवाजमा नव्हता. अत्यंत साधेपणाने त्यांनी भाजीची पिशवी खांद्यावर घेतली. त्यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. सुनील केंद्रेकर पूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत होते. 

आयएएस अधिकारी म्हटलं की एसी ऑफिस, टुमदार प्रशस्त घर, आलिशान कार, नोकर, बॉडीगार्ड असं चित्र नेहमीच आपल्याला पाहण्यास मिळतं. मात्र सुनील केंद्रेकर हे त्यांच्या शिस्तप्रिय स्वभावाप्रमाणेच त्यांच्या साधेपणासाठीही ओळखले जातात. या फोटोमध्ये त्यांचा साधेपणा दिसून येत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद येथील बाजारातला हा फोटो आहे. सोशल मीडियावर हा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. सुनील केंद्रेकर हे खुलताबाद या ठिकाणी आले होते. त्यावेळी त्यांना आठवडी बाजार भरलेला दिसला. ज्यानंतर त्यांनी पत्नीसोबत बाजारात जाऊन भाजी खरेदी केली. त्यानंतर भाजीने भरलेली पिशवी खांद्यावर उचलून घेतली. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. फेसबुक आणि व्हाट्सअपवर केंद्रेकर यांचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.