दोडक्याच्या वेलीत होता इंडियन कोब्रा! अन् मग...

दोडक्याच्या वेलीत होता इंडियन कोब्रा! अन् मग...

मोहोळ : शेतकरी गणेश नागटिळक यांच्या एक एकर क्षेत्रावर दोडका पिक आहे. त्याचा माल सध्या बाजार पठेत विक्रिस जात आहे. दोन दिवसापूर्वी सकाळी १० च्या सुमारास तोडा सुरु असताना गणेश यांचे वडील वसुदेव हे वेलिवरुन दोडका तोडत असताना त्यांना दोडक्या ऐवजी काळाभोर हाताच्या मनगटाच्या आकारा इतका जाड नाग फणा काढून फूत्कार टाकत उभा असलेला दिसला. 

वसुदेव हे जोरात ओरडले व ते पिकातुन बाहेर पळत आले. त्यांच्या शेजारचे महिला मजूरही बाहेर पळत आले. वसुदेव यांचा मुलगा गणेश हाही दोडका तोडत होता त्याने ही सदर नागास पाहिले, पाच फुट लांब, एक फुट ऊंच फणा काढून गोलाकार आटोळे वेटोळे घालून बसलेल्या काळ्याभोर नागास पाहुन सर्वांचे अंग थरथर कापत होते. 
गणेश यांनी तात्त्काळ आष्टी येथील सर्पमित्र शंकर दगडे यांच्याशी संपर्क साधला, दगडे हे आपल्या एक सहकारीघेवून शेतात दाखल झाले व त्यांनी सदर नागास पकडून एका प्लास्टिक भरनी मधे बंदिस्त केले, तेव्हा गणेश यांच्यासह सर्व महिला मजूरांनी सुटकेचा निश्वास टाकला. नाग पकडून बंदिस्त करेपर्यन्त अर्धा तास तोडा बंद होता, नागटिळक कुटुंबातिल सदस्यासह महिला मजूर काम करन्यास घाबरत होत्या.
शंकर दगडे यांनी पकडलेल्या नागा विषयी उपस्थित महिला मजूर व नागटीळक यांना माहिती दिली. नाग इंडियन कोब्रा असल्याचे त्यांनी सांगितले. या नागास आष्टी भागातील जंगलात सोडल्याचे दगडे यांनी सांगितले. 

सध्या वन्यजीव सप्ताह सुरु असल्याचे माझ्या वाचनात आले होते, वन्य जीवांचे रक्षण करने आपले कर्त्तव्य आहे, अनेक वन्य जीव  जाती नामशेष होवू लागल्या आहेत.पूर्वी शेतात,ग्रामीण भागात सतत साप, नाग दिसायचे, आता त्याचे प्रमाण कमी झाले आहे, माझ्या कुटुंबाला सदर नागाने कोणतीही ईजा पोहचविली नाही मग आपण का त्यास ईजा करायची म्हणून मि सर्पमित्रास बोलावून सदर नाग निर्जन ठिकाणी जंगलात सोडुण दिला.
- गणेश नागटिळक, 
युवा शेतकरी पापरी