सापडलेले 10 रुपये सुद्धा कोणी परत करत नाही! मंद्रूपमध्ये मात्र..

सापडलेले 10 रुपये सुद्धा कोणी परत करत नाही! मंद्रूपमध्ये मात्र..

mandrup bar owner returns money

दारूच्या नशेत बारमध्ये विसरले पाच लाख 25 हजार! 

सोलापूर : आज-काल शंभर रुपये सापडले तरी कोणी परत करण्याच्या भानगडीत पडत नाही. मंद्रूप परिसरातील एका बारमध्ये पाच लाख 25 हजार रुपयांची रक्कम हरवली होती. ही रक्कम परत करण्यात आली.‌

पूजा बार मंद्रुप येथे अनोळखी व्यक्ती दारू पिण्यासाठी आला होता. नशेत 525000 रुपये विसरुन गेला होता. बारचे चालक सुधाकर गोपाळराव कोरे यांच्या सावधानतेमुळे ती रक्कम त्या व्यक्तीस परत देण्यात आली.

ती रक्कम बाजार समिती येथील येथील एका व्यापाराची होती. त्या व्यापाऱ्याचा ड्रायव्हर हा बारमध्ये दारू पिण्यासाठी आला होता. दारूच्या नशेत त्याने आपल्याकडील पाच लाख 25 हजार रुपये बारमध्ये विसरले. शुध्दीत आल्यावर पैसे विसरल्याचे आठवण आल्यावर मालकांनी पुजा बारचे मालक सुधाकर कोरे यांना संपर्क साधला. त्यानंतर सुधाकर कोरे यांनी ती रक्कम त्यांचीच आहे याची खातरजमा केली. ती रक्कम ज्येष्ठ नेते गोपाळराव कोरे यांच्या हस्ते त्या व्यापाऱ्याला परत देण्यात आली. आजकाल सापडलेले 100 रुपये देखील देण्याची मानसिकता नसताना तब्बल 5 लाख 25000 एवढी मोठी रक्कम परत केली. याचीच चर्चा मंद्रुपमध्ये होत आहे. याकामाकरिता कोरे कुटुबीयांचे आज दिवसभर गावात कौतुक होत आहे.

ती रक्कम परत करताना ज्येष्ठ नेते सभापती गोपाळराव कोरे, पूजा बारचे मालक व मंद्रुप ग्रामपंचायत सदस्य सुधाकर कोरे, पेट्रोलपंप चालक युवराज कोरे, गोपाळकाका कोरे कार्यकर्ते संतोष बरुरे, हेळवी गुरुजी, महेश कट्टीमनी, सतिश शिंदे, सतिश कोरे, बारचे व्यवस्थापक युन्नुस शेतसंदी, बबलु शेतसंदी आदी उपस्थित होते.