दहा दिवसात काम वाटप करा अन्यथा झेडपी समोर आंदोलन!

दहा दिवसात काम वाटप करा अन्यथा झेडपी समोर आंदोलन!

महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनेचे राज्य अध्यक्ष इंजि मिलिंद भोसले यांनी दिला इशारा

सोलापूर : सुशिक्षित बेरोजगार अभियंता व ओपन कंत्राटदार व मजुर सहकारी संस्था यांचे दहा दिवसात काम वाटप न केल्यास सोलापुर जिल्हा परिषद च्या  विरोधात तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी दिला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने जुन २०२१ या महिन्यात १० लाखाची आतील कामे लाॅटरी पध्दतीने सुशिक्षित बेरोजगार स्थापत्य अभियंता, ओपन कंत्राटदार, मजुर सहकारी संस्था यांना वाटप करण्यात यावे असा शासन निर्णय घेतला आहे या निर्णयाची अंमलबजावणी करावी यासाठी राज्य संघटनेचे पदाधिकारी य जिल्हा परिषद चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी अभियंता यांना  दोन तीन वेळा भेट घेतली व पाठपुरावा केला तसेच मागील चार महिन्यात  संघटनेचे आर पत्र दिले परंतु जिल्हा परिषद प्रशासनानाकडून काहीही दखल घेतली नाही ही बाब राज्य संघटनेने गंभीर स्वरुपात घेतली आहे. 

सदर जिल्हा परिषद कडील निघालेले सर्व कामे नियमबाह्य पद्धतीने व बेकायदेशीर पणे ग्रामपंचायत यांना बहाल करण्यात येत आहे तसेच शासनाने दिलेला तिन्ही संवागासाठी  असलेला ३३;३३:३४ चा काम वाटपाचा कोटा पायदळी तुडविला आहे यांस हे वरील संपूर्ण प्रशासन जबाबदार आहे हे सर्व आर्थिक सक्षमीकरण साठी हा उपक्रम संबंधित प्रशासनाचा हेतु आहे हे स्पष्ट दिसून येते. 

यासाठी येणाऱ्या दहा दिवसांच्या आत सदर या तिन्ही वर्गासाठी लाॅटरी पध्दतीने कामे वाटप न केल्यास राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना फार मोठे आंदोलन जिल्हा परिषद सोलापूर यांच्या कार्यालयासमोर करण्यात येणार आहे असा इशारा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनेचे राज्य अध्यक्ष इंजि मिलिंद भोसले, कांतीलाल डुबल, कैलास लांडे, नरेंद्र भोसले , पोपट मुळे, गोविंद अंनागुडे, मनोहर शिराळ, आंनद वंजारी, या पदाधिकारी यांनी प्रशासनास दिले आहे. तशा प्रकारचे लेखी पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता यांना दिले आहे.