सोलापूरकरांचा सामाजिक नेता! मिलिंद भोसले वाढदिवस विशेष

सोलापूरकरांचा सामाजिक नेता! मिलिंद भोसले वाढदिवस विशेष

सामान्य जनतेतुनच आलेले जनसामान्यांचे नेतृत्व इंजि मिलिंदजी भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

या वीस - एकवीस वर्षांत असे एक व्यक्तीमत्व आम्हाला भेटले की स्वत:च्या आयुष्यात स्वत:ची काळजी व व्यवसायाकडे पाहण्याऐवजी दुसऱ्यांची कामे कसे होतील, त्यांच्या अडचणी, समस्या, प्रश्न  कसे सोडवता येतील, त्यांना रोजगार कसा देता येईल याचाच मनोमनी विचार करत असते. त्या व्यक्तिमत्त्वाचे नाव आहे इंजिनियर मिलिंद भोसले.

आयुष्यात पैसा हे सर्वस्व नाही ही वस्तुस्थिती दाखवत, तसेच कुठेही स्वार्थ हा शब्दच जिवनात शिवला नाही आणि  हेच कायम आपल्या स्वभावातुन व कृतीतून दाखवुन दिले. यामुळे राज्यात मिलिंदजी नावातच एक खंबीर विश्वास,आदर, सगळयात  महत्वाचे म्हणजे खरेपणा हीच वास्तवाची शिदोरी घेत हजारोंचे हात हात घेत, कुणाच्याही बाबतीत वाईट न चिंतन करता व वाईट कृती न करता यशाच्या शिखर पादाक्रांत केले आहे.

मिलिंद भोसले यांची ‘स्मार्ट सोलापूरकर’वर घेतलेली सविस्तर मुलाखत पाहा-

आज आपल्या माध्यमातून राज्यातील असंख्य संस्थांचे पद भुषवित असताना लाखों जनसामान्यांचे जाळे राज्यभर निर्माण केले आहे आणि आपला आयुष्यातील बहुमूल्य वेळ त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी घातला आहे आणि हे करताना कुठेही स्वभावात,कृती मध्ये  गर्व, अंहकार, मीपणाचा शिरकावच करु शकला नाही. जमीनीवर कायम आपले पाय यामुळेच एवढी मोठी जनशक्ती, जनसामान्यांचे नेतृत्व उभे राहिले नुसते उभे नाही तर एवढा प्रदीर्घ काळापासून चिरंतर आहे.

अशा सर्वमान्य नेतृवाच्या व्यक्तीमत्त्वास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

- इंजि कांतीलाल डुबल, कैलास लांडे, नरेंद्र भोसले,सतीश शेंडे,विलास बेडगे,आंनद पाटील