एम.के.फाउंडेशनतर्फे पूरग्रस्तांना मदतीचा हात

एम.के.फाउंडेशनतर्फे पूरग्रस्तांना मदतीचा हात

500 कुटुंबाना जीवनावश्यक वस्तुसंह, कपड्यांची मदत

सोलापूर : सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक कुटुंब उद्वस्था झाल्या आहेत.महाराष्ट्रातील अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून पूरग्रस्त कुटुंबाना मदत ओघ सुरू आहे.

सोलापूरातील एम.के.फाउंडेशनच्या माध्यमातून आज सामाजिक जाणिवेतून पूरग्रस्त बांधवाना जीवनावश्यक वस्तुसंह,साड्या, कपडे टॉवेल, नॅपकिन आणि पाणी बॉटल या साहित्यांनी भरलेली गाडी पाठवण्यात आली.

शांती नगरचे प.पु.शिवपुत्र महास्वामीजी यांच्या शुभहस्ते साहित्यांनी भरलेल्या वाहनाची पूजा करून वाहनाची रवानगी करण्यात आली. यावेळी एम.के.फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे, सागर सिमेंटचे  आनंद लोणावत,वशीम पटेल,राठीजी, महेश करवा, राहुल भैया, अश्पाक शेख,शिवा होसाळे, सामाजिक कार्यकर्ते अमोल कारंडे,सुभाष बिराजदार, सिद्धाराम हंचनाळ,किरण राठोड, मल्लिकार्जुन मंदोली,नागनाथ कोगनुरे,रेवणप्पा भैरामडगी आदी उपस्थित होते.