प्रणितीताईंकडे आणखी एक महत्वाची जबाबदारी! वाचा..

प्रणितीताईंकडे आणखी एक महत्वाची जबाबदारी! वाचा..

प्रणितीताईंकडे आणखी एक महत्वाची जबाबदारी! वाचा..

सोलापूर : सोलापूरच्या युवा आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे गेल्या महिन्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

आमदार प्रणिती शिंदे या अनुसुचित कल्याण समितीच्या आहेत. गेल्या महिन्यात प्रदेश कार्याध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यानंतर पक्षाने आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे महिला काँग्रेसच्या प्रभारी पदाची जबाबदारीही दिली आहे. मंगळवारी आणखी एक महत्त्वाची जबाबदारी आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे. 

केरळ राज्याच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाचे उमेदवार छानणी समिती (स्क्रीनिंग कमिटी) च्या सदस्य पदावर आमदार प्रणिती शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे आमदार प्रणिती शिंदे यांची निवड घोषीत केली आहे.