खा. संभाजीराजे यांची जनसंवाद यात्रा बुधवारी सोलापुरात

खा. संभाजीराजे यांची जनसंवाद यात्रा बुधवारी सोलापुरात

सोलापूर : मराठा समाजाच्या आरक्षणावरून खासदार संभाजीराजे हे जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यभरात संवाद साधत आहे. ही यात्रा बुधवार, दि. २७ ऑक्टोबर रोजी साेलापूर जिल्ह्यात येत आहे. यानिमित्त मोहोळ व सोलापूर येथे मेळावा हाेणार असल्याची माहिती, सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी दिली.

बुधवारी सकाळी ११ वा. मोहोळ येथील घटोळे मंगल कार्यालयात तसेच याच दिवशी सायंकाळी ५ वा सोलापुरातील शिवाजी प्रशालेत मेळावा होणार आहे. या मेळाव्यात खासदार संभाजीराजे आरक्षणाच्या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. या जनसंवाद यात्रेत राजेंद्र कोंढरे (पुणे ), संभाजी भोर (नगर), करण गायकर (नाशिक), अंकुश कदम (नवी मुंबई), धनंजय जाधव(पुणे), विनोद साबळे (पनवेल) आदींची प्रमुख सहभाग आहे. या पत्रकार परिषदेस राजन जाधव, भाऊसाहेब रोडगे, एकनाथ घाडगे, राम साठे, प्रा.सचिन गायकवाड, चंद्रकांत पवार उपस्थित होते.