नितीन गडकरींना द्या सोलापूर विद्यापीठाची मानद पी.एच.डी.!

नितीन गडकरींना द्या सोलापूर विद्यापीठाची मानद पी.एच.डी.!

नितीन गडकरींना द्या सोलापूर विद्यापीठाची मानद पी.एच.डी.!

वाचा.. कोणी आणि का केली ही मागणी

सोलापूर : भारताच्या दुर्गम खेडोपाड्यापर्यंत उत्कृष्ट राष्ट्रीय रस्त्याचे जाळे निर्माण करुन भारताच्या विकासात मोलाचे योगदान देणारे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि दळणवळण मंत्री नितिन गडकरी यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडुन मानद पी.एच.डी. पदवी प्रदान करण्यात यावी अशी विनंती गिरिकर्णिका फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय कुंदन जाधव यांनी विद्यापीठ प्रशासनाला केली आहे. 

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विविध योजने अंतर्गत देशात रस्तांचे उत्कृष्ट जाळे निर्माण करण्यात आले असून त्याचा सकारात्मक फायदा भारतीय अर्थव्यवस्थेवर होत आहे.

२०२५ सालापर्यंत राष्ट्रीय महामार्गावरील रस्ते अपघात पन्नास टक्क्यांवर आण्यासाठी रस्ते वाहतूक आणि दळणवळण मंत्रालाय विविध योजनां द्वारा जनजागृतीचे कार्य करणार असल्याचे नितिन गडकरी यांनी एका कार्यक्रमात नमुद केले होते. गिरिकर्णिका फाऊंडेशनच्या वतीने सोलापूरसह देशसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उत्कृष्ट उपक्रमांची दखल स्थानिक तसेच राष्ट्रीय पातळीवर सकारात्मकतेने घेऊन त्या कार्याचे अनुकरण करण्याचे टिपन अनेक मंत्रालयांनी दिले आहे असे गिरिकर्णिका फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय कुंदन जाधव यांनी म्हटले आहे.

पु.अ.हो.सोलापूर विद्यापीठाच्या वतीने देशासाठी अमुलाग्र आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना मानद पी.एच.डी. पदवी प्रदान करण्यात आल्या आहेत. नितीन गडकरी यांच्या कार्याचा यथोचित सन्मान होण्यासाठी त्यांना पु.अ.हो.सोलापूर विद्यापीठाच्या वतीने मानद पी.एच.डी.पदवी प्रदान करुन त्यांचा गौरव करण्यात यावा असे सोलापुरच्या मान्यवर तज्ञ व्यक्तींची अनेक दिवसांपासून इच्छा होती, त्यांच्या विनंतीस मान देऊन गिरिकर्णिका फाऊंडेशनने इमेलद्वारे विद्यापीठ प्रशासनाकडे निवेदनाद्वारे विनंती केली आहे. नितीन गडकरी यांच्या धोरणानुसार २०३० साला पर्यंत इलेक्ट्रिक वाहन निर्मिती, वितरण आणि जनसामान्यांच्या वतीने त्याच्या योग्य वापर ह्या माध्यमातुन पर्यावरणपुरक वाहन रस्तांवर दिसतील आणि भारत कार्बन न्युट्रल देश बनेल असा सकारात्मक विश्वास सोलापूरातील तज्ञ मंडळी व्यक्त केला आहे.