एनटीपीसीची सकारात्मक बातमी! वाचा...

एनटीपीसीची सकारात्मक बातमी! वाचा...

एनटीपीसी-सोलापूर प्रकल्पाचे मुख्य महाव्यवस्थापक नामदेव उप्पर यांनी दिली माहिती 

सोलापूर : एनटीपीसी-सोलापूर व्यवस्थापनाच्या प्रयत्नातून सिंगारेनी कोलरिज कंपनी लिमिटेड (एससीसीएल) कडून कोळसा खरेदी केली जात आहे. त्यामुळे एनटीपीसी-सोलापूर प्रकल्प वीज निर्मितीचा दर खाली आणण्यात यशस्वी ठरला आहे. परिणामी, सोलापूर प्रकल्पातुन  दोन्ही संयंत्राद्वारे पुर्न क्षमतेने वीज निर्मितीत उत्कृष्ट योगदान देत आहेत. त्याचबरोबर एनटीपीसी-सोलापूर प्रकल्पात 23 मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प आणि एश डेक क्षेत्रामध्ये 40 मेगावॅटचा सौर प्रकल्प उभारण्यात येणार आहे, अशी माहिती एनटीपीसी-सोलापूर प्रकल्पाचे मुख्य महाव्यवस्थापक नामदेव उप्पर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

चर्चेदरम्यान श्री नामदेव उप्पर म्हणाले, या व्यतिरिक्त एनटीपीसी-सोलापूर प्रकल्पात फ्ल्यू गॅस मधील एसओएक्सचे प्रमाण कमी करण्यासाठी एफजीडी यंत्रणेचे कामही प्रगतीपथावर असून मार्च-२०११ पर्यंत प्रथम युनिट कार्यान्वित करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. पर्यावरण आणि समुदायक विकासाविषयी बोलताना मुख्य महाव्यवस्थापक नामदेव उप्पर म्हणाले की एनटीपीसी-सोलापुरने परिसर हिरवा आणि स्वच्छ वातावरणासाठी सोलापूर जिल्ह्यात 3,,50,000 हून अधिक वृक्षारोपण, सामाजिक वनीकरणच्या माध्यमातुन केले आहे. कोरोना व्हायरस साथीच्या गंभीर काळात एनटीपीसी-सोलापुरातर्फे सातत्याने वीज निर्मिती केली जात होती आणि कोरोना दूर ठेवण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शक तत्त्वे पाळली जात होती. महामारी दरम्यान, जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग आणि आस-पासच्या गावांमध्ये फेस मास्क, सेनेटिझर्स, हातमोजे आणि सोलापूर कोविड केअर सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्रे, होटगी यानां थर्मल स्कॅनर, मल्टी मॉनिटर्स आणि वैद्यकीय साहित्य वाटप करण्यात आले. गरजू व स्थानंतरीत कामगारांना धान्य वाटप केले आहे. यासह कोविड माहामारी  निपट्ण्यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाला पाच लाखांची रक्कम देण्यात आली आहे.

प्रकल्पग्रस्त गावांमध्ये सामुदायिक विकास कार्यक्रम अंतर्गत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन शाळांमध्ये बसविण्यात आल्या आहेत, 150 हुन अधिक शौचालया, ओव्हर हेड टँक, जिल्हा परिषद शाळांच्या 70 वर्गांच्या डिजिटलाजेशन व अंगणवाडी बांधकाम इत्यादीसाठी 4..8 कोटी जिल्हा प्रशासना कडे जमा केले आहेत. सोलापूर शहराची पाणीटंचाई लक्षात घेता एनटीपीसीने उजनी ते सोलापूर शहरापर्यंत पाण्याची पाईप लाईन टाकण्यासाठी सोलापूर महानगर पालिकेला 250 कोटी रुपये देण्याच्या सामंजस्य करार केला आहे.

पत्रकार परिषद दरम्यान श्री नामदेव उप्पार, मुख्य महाव्यवस्थापक (सोलापूर) यांनी सांगितले की एनटीपीसी-सोलापूर प्रकप्ल एक सुपर क्रिटिकल प्रकल्प आहे. प्रकल्पात 660 मेगावॅटची दोन संयंत्र असून एकूण स्थापित क्षमता 1320 मेगावॅट आहे. या प्रकल्पातील वीज निर्मितीचे लाभार्थी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा, दमण आणि दीव, दादर आणि नगर हवेली ही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आहेत. एनटीपीसी बद्दल बोलताना श्री उप्पार म्हणाले एनटीपीसी ची आज एकूण स्थापित क्षमता 62,918 मेगावॅट आहे (ज्यात संयुक्त प्रकल्पांचा समावेश आहे) 24 कोळसा आधारित, 7 गॅस आधारित, 1 हायड्रो बेस्ड, 1 लघु जलविद्युत, 1 पवन आधारित, 12 सौर स्टेशन देशभरात आहे. संयुक्त उपक्रमात 9 कोळसा, 4 गॅस आणि 12 अक्षय ऊर्जा प्रकल्पांचा समावेश आहे. एनटीपीसीने 2032 पर्यंत 1,30 गिगावॉट स्थापित वीज क्षमता गाठण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

पत्रकार परिषदेला श्री नामदेव उप्पार, मुख्य महाव्यवस्थापक (सोलापूर), श्री के. व्यंकट्या, सरव्यवस्थापक (तांत्रिक सेवा), श्री अनिल कुमार, सरव्यवस्थापक (प्रकल्प व एफजीडी), श्री अनिल श्रीवास्तव, महाव्यवस्थापक (देखभाल) आणि श्री दीपक. रंजन देहुरी, महाव्यवस्थापक (ऑपरेशन्स), जनसंपर्क अधिकारी शरद शिंदे उपस्थित होते. पत्रकार परिषदेपूर्वी माध्यम प्रतिनिधींनी सोलापूर प्लांटला भेट दिली व विज निर्मितीच्या तांत्रीक बाबींची माहीती घेतली.