सोलापुरात प्रथमच महिला अधिकाऱ्याकडे पोलीस ठाण्याची जबाबदारी

सोलापुरात प्रथमच महिला अधिकाऱ्याकडे पोलीस ठाण्याची जबाबदारी

सोलापूर : लाच प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर सलगर वस्ती पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपत पवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे यांच्यावर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. 

संपत पवार यांच्या निलंबनानंतर सदर बाजार पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांची आता सलगर वस्ती पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. अश्विनी भोसले यांच्या ठिकाणी म्हणजे सदर बाजार पोलीस ठाण्याच्या दुय्यम पोलीस निरीक्षकपदी नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक चंद्रकांत वाबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सोलापूर शहरात पहिल्यांदाच पोलिस ठाण्याचा पदभार महिला पोलीस अधिकाऱ्याकडे असणार आहे. सदर बाजार पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सर्व आंदोलनासोबत गुन्हेगारी नियंत्रणासाठी पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी चांगल्या प्रकारे काम केले आहे.‌ आजवरच्या त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी त्यांच्याकडे आता पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पदाची जबाबदारी दिली आहे.