दहावी परीक्षेत पोदार इंटरनॅशनल स्कूल सोलापूरचे यश

दहावी परीक्षेत पोदार इंटरनॅशनल स्कूल सोलापूरचे यश

सोलापूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालामध्ये पोद्दार इंटरनॅशनल स्कूल सोलापूरच्या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश मिळवले आहे. 

मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचे निकाल 15 जुलै रोजी घोषित करण्यात आला. या परीक्षेसाठी विद्यालयातून एकूण 27 विद्यार्थी  बसले होते. या परीक्षेमध्ये सर्व विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. शाळेचा निकाल 100% इतका लागलेला आहे. 

कुमारी हीर मेहता यांनी ९५.६०% मिळवून विद्यालयात प्रथम  क्रमांक मिळविला. तर कुमार  हर्ष जाधव 95.02% घेऊन विद्यालयात द्वितीय व कुमार आदित्य खोत 94.80% घेऊन तृतीय आला. विद्यालयाच्या यावर्षीच्या दहावीच्या निकालाचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे 27 विद्यार्थ्यांपैकी 15, विद्यार्थी, 90% टक्क्यांपेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण झाले. 12 विद्यार्थी 85% पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झाले विद्यालयातील कुमारी हीर  मेहता व कुमार ओंकार घोडके यांनी माहिती व तंत्रज्ञान या विषयांमध्ये शंभर पैकी शंभर गुण घेऊन नवा किर्तीमान स्थापन केला. विद्यालयाच्या निकालांची सरासरी 89.35% आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजयकुमार पांडा यांनी अभिनंदन केले आहे आणि विद्यार्थ्यांना भविष्यातील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.