पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थी संसद मंडळाचे उद्घाटन

पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थी संसद मंडळाचे उद्घाटन

सोलापूर : नावीन्यपूर्ण गोष्टींसाठी ओळखल्या जाणाऱ्या सोलापुरातील प्रतिष्ठित अशा पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थी संसद मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. 

"शाळा बंद आणि शिक्षण सुरू "असे जरी ऑनलाइन माध्यमातून सुरू असले तरी विद्यार्थ्यांना सतत शाळेत असल्याचा अनुभव घेता यावा. त्यांच्या कलागुणांना वाव देता यावा, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि त्यांच्यात नेतृत्वगुणांचा विकास व्हावा म्हणून पोदार इंटरनॅशनल स्कूल सतत प्रयत्न करत असते. ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून कितीतरी गोष्टी विद्यार्थ्यांना शाळेत न येता घरातून करता याव्या म्हणून विद्यार्थी संसद मंडळाची स्थापना ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. या व्हर्च्युअल कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपायुक्त डॉ.वैशाली कडूकर, कर्नल एस. पी. कुलकर्णी, जनरल मॅनेजर (पोदार एज्युकेशन नेटवर्क ,कोल्हापूर , विभाग ) हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रशालेचे प्राचार्य समरेन्द्र पाणिग्रही यांनी स्वीकारले. यामध्ये सर्वप्रथम इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रश्नावली देण्यात आली. इच्छुक विद्यार्थ्यांची नावे निवडण्यात आली. इयत्ता सहावी ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांकडून  लोकशाही पद्धतीने मतदान करण्यात आले. या विद्यार्थी संसद मंडळांमध्ये अनेक प्रतिनिधींची निवड दि. 31जुलै रोजी करण्यात आली. 

यामध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनी प्रतिनिधीप्रमुख म्हणून सोहम दास आणि नेहा अय्यर, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी क्रीडा प्रमुख म्हणून आर्यन गायकवाड आणि श्रेया मिस्कीन, विद्यार्थी आणि विदयार्थीनी सांस्कृतिक प्रमुख अर्ष अली, आणि प्रियदर्शनी, अनुशासन विद्यार्थी -विद्यार्थिनी प्रतिनिधी मिथिलेश देसाई आणि अनुश्री जवेरी, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी कल्याण समिती प्रमुख म्हणून अनिमेष इंडे आणि हिबा  पटेल, 2021-22 वार्षिक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून ओम ढंगे आणि इंशा आफ्रीन यांची निवड करण्यात आली. 

याबरोबर सर्व शालेय हाऊसच्या प्रतिनिधींची देखील निवड करण्यात आली. यामध्ये एक्वा हाऊस कॅप्टन म्हणून संचिता बोरकर आणि अथर्व शेळके, टेरा हाऊस कॅप्टन पार्थ उडानशिव आणि हर्षवर्धनी चेकापल्ली , इग्निस हाऊस कॅप्टन लकी जाधवआणि अनुप कलमनी , व्हेन्टस हाऊस कॅप्टन सुजल रोकडे आणि इकरा फनिबंद यांची तर एक्वा हाऊस प्रीफेक्ट म्हणून मयुरेश तूपकरी आणि अनुष्का साहू, टेरा हाऊस प्रेफेक्ट  म्हणून प्रणव जैन आणि माधुरी लवटे, इग्निस हाऊस प्रीफेक्ट अंकुर राज आणि ऐश्वर्या झुंझे, व्हेन्टस हाऊस प्रीफेक्ट क्रिस केविन आणि गौरी जाधव यांची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे ऑनलाईन घेण्यात आलेल्या या समारंभात निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांकडून बॅचेस लावण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रमुख पाहुणे आणि मान्यवर पाहुण्यांची ओळख आणि परिचय श्री राम सर आणि लक्ष्मण उपाडे यांनी करून दिला. संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा प्रशालेच्या सीनियर कॉर्डिनेटर श्रीमती आसमा तडमोड यांनी सांगितली. कार्यक्रमातील प्रमुख अतिथी मान्यवर डॉ. वैशाली कडूकर यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत संबोधित केले. संपूर्ण कार्यक्रम प्रशालेचे प्राचार्य समरेन्द्र पाणिग्रही आणि व्यवस्थापक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी प्रशालेच्या इवेंट कॉर्डिनेटर श्रीमती कविता पाटील मॅडम, कुमारी मीनाक्षी पवार मॅडम, श्रीमती पूजा कुंडू, अविनाश पाटील सर व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता आठवीतून शुभम पाणीग्रही आणि प्रथमेश चौधरी या विद्यार्थ्यांनी केले. तर आभार प्रदर्शन संतोष वाळवेकर सर यांनी केले. ऑनलाईन घेण्यात आलेल्या  समारंभात निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे प्रशालेचे प्राचार्य माननीय समरेन्द्र प्राणीग्रही यांनी अभिनंदन केले. अतिशय आनंदात आणि उत्साहात विद्यार्थी संसद मंडळ समारंभ पार पडला.