पगाराच्या रकमेतून कोकण पूरग्रस्तांना मदतीचा हात

पगाराच्या रकमेतून कोकण पूरग्रस्तांना मदतीचा हात

सोलापूर : महामार्ग पोलीस अंमलदार गणेश शिंदे यांनी त्यांच्या एक महिन्याच्या पगारातून अन्नधान्य आणि इतर वस्तू घेऊन कोकण पूरग्रस्तांना मदत केली आहे. गणेश शिंदे यांच्या सामाजिक भूमिकेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. जेवढ्या उत्साहाने आपण कोकण फिरायला जातो, तेवढ्याच जिद्दीने आपण सर्वांनी कोकड पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले पाहिजे असे शिंदे यांचे म्हणणे आहे.

पोलीस अंमलदार गणेश शिंदे यांचे हे सामाजिक कार्य अनुकरणीय आहे. त्यांच्या या सामाजिक भूमिकेचे सर्व स्तरातून स्वागत आणि कौतुक होत आहे. गणेश शिंदे यांनी आपल्या एका महिन्याच्या 36 हजार रुपयांच्या पगारातून अन्नधान्य आणि विविध वस्तू खरेदी केल्या. अन्नधान्य आणि विविध वस्तू गणेश शिंदे आणि त्यांच्या मित्रांनी बुधवारी कोकणात पूरग्रस्तांना दिल्या आहेत.

--
मी १४ वर्षे झाली पोलीस सेवेमध्ये काम करीत आहे. सर्वसामान्य माणसांचा पोलिसांवर असणारा विश्वास आणखी दृढ झाला पाहिजे. हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून मी प्रत्येक वेळेस सामाजिक कार्यात हातभार लावतो. राज्यातील पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी समाजाच्या प्रत्येक घटकाने शक्‍य होईल तितकी मदत करावी. आपल्या पूरग्रस्त बांधवांना करण्यासाठी पुढाकार घ्यावा. पूर परिस्थितीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. हे नुकसान न भरून येणारे आहे. मात्र या कठीण परिस्थितीत आम्ही आपल्या पाठीशी आहोत. हा धीर पूरग्रस्तांना द्यायचे काम महाराष्ट्रातील सर्व जनतेने करावे. जेवढ्या उत्साहाने कोकण फिरायला जात होतो, तेवढ्याच जिद्दीने आज मी कोकणाला मदत करण्यासाठी गेलो आहे.
- गणेश शिंदे, 
पोलीस अंमलदार