पोलिस स्मृती दिनानिमित्त जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडून श्रद्धांजली

पोलिस स्मृती दिनानिमित्त जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडून श्रद्धांजली

सोलापूर : पोलिस स्मृती दिनानिमित्त मागील वर्षभरात कर्तव्यावर असताना शहीद झालेल्या पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पोलिस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात पुष्पचक्र अर्पण श्रद्धांजली वाहिली.

यावेळी पोलिस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, पोलिस उपायुक्त दिपाली धाटे, वैशाली कडूस्कर, राज्य राखीव पोलिस गट 10 चे समादेशक विजयकुमार चव्हाण, पोलिस प्रशिक्षण केंद्र च्या प्राचार्य सपना गोरे यांच्यासह पोलिस विभागाचे अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

समाजात शांतता व सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलिस सातत्याने प्रयत्नशील असतात. तरी एक जागरूक नागरिक म्हणून समाजातील प्रत्येक घटकाने पोलिस विभागास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले.

यावेळी शहीद सदाशिव भीमाशंकर लाड व राहुल सुभाष शिंदे यांचे आई वडील तसेच अन्य मान्यवर यांनी पोलिस स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. पोलिस दलाने बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून तसेच पोलिस वाद्य वाजवून शहिदांना मानवंदना दिली.