उस्मानाबादच्या ओंकारचे होतेय कौतुक

उस्मानाबादच्या ओंकारचे होतेय कौतुक

कुणाचे देव देवळात असतात, तर कुणाला देव रस्त्यावर भेटतात. 
असेच आज नवरात्राच्या दिवसात या माऊलीची अचानक भेट झाली. आजीना गावी जाण्यासाठी १० रुपये हवे होते पण पैसे मागताना आजींच्या चेहऱ्यावर नामुष्की जाणवत होती.
यांना बोलल्यानंतर कळाले आजींना आपले म्हणावे असे कोणीच नाही. या एकट्या एका खेडेगावामध्ये राहतात. या वयात सुद्धा मिळेल तिथे भांडे घासायचे काम आजी करतात. 
मनामध्ये विचार आला मलासुद्धा आजी आहे तिला पाहायला माझी आई, माझ्या काकू तसेच घरातील इतके सर्वजण आहेत.
पण यांचा विचार केला तर यांना घरात एक सुद्धा व्यक्ती नाही किती अवघड गोष्ट आहे. 
आजीची अवस्था पाहून वाईट वाटले आणि चला आज साक्षात देवी भेटायला आली अशी धारणा करून आजीसोबत काही आनंदी क्षण जगलो.
सर्वप्रथम आम्ही मस्त सफरचंदाचा ज्यूस घेतला, आजी कडे एकच साडी आणि ती पण अनेक ठिकाणी फाटलेली मग आम्ही आजींच्या मनपसंत अशी नऊवारी साडी घेतली. नंतर फळे घेऊन आजींना त्यांच्या ठिकाणाला सोडले. 
आजींना झालेला आनंद त्यांच्याकडे पाहून स्पष्ट दिसत होता, त्यांनी देखील बदल्यात अनमोल असा भरभरून आशीर्वाद दिला. 

पोस्ट करण्याचा उद्देश एवढाच
आपण मंदिरात कशासाठी जातो? तर एक प्रकारे मनाला समाधान, शांती लाभावी म्हणूनच ना..
तर मग आपणही कधी तरी असा देव शोधा हे समाधान त्याहून मोठे आहे.

- ओंकार नायगावकर, उस्मानाबाद