इको फ्रेंडली क्लबची निसर्ग भ्रमंती; केंजळगड, रायरेश्वर पठारावर फुलोत्सव

इको फ्रेंडली क्लबची निसर्ग भ्रमंती; केंजळगड, रायरेश्वर पठारावर फुलोत्सव

सोलापूरसह, पुणे, औरंगाबाद, सांगली, कोल्हापूर येथील निसर्गप्रेमींचा सहभाग

सोलापूर : लाल, पिवळ्या, निळ्या, गुलाबी, पांढर्‍या फुलांनी सजलेल्या केंजळगड आणि रायरेश्वर पठारावर सोलापूरसह पुणे, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद येथील निसर्गप्रेमींनी भटकंती केली. निसर्ग पर्यटन वाढावे यासाठी कार्यरत असलेल्या इको फ्रेंडली क्लबच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेल्या रायरेश्वर पठारावर आणि तेथून जवळच असलेल्या केंजळगडावर शनिवार आणि रविवारी ट्रेकिंगचे आयोजन करण्यात आले.

सर्व निसर्गप्रेमी शनिवारी पहाटे पुण्याजवळील प्रसिध्द अशा केतकवळे येथे पोचले. प्रति बालाजी मंदिराच्या दर्शनानंतर सर्वांनी चहा-नाश्ता केला आणि सर्वजण पुढे मार्गस्थ झाले. भोर जवळील नेकलेस पॉईंटला भेट देवून सर्वांनी छान फोटोग्राफी केली. तेथून सर्वजण भोरमध्ये पोचले. रायरेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक चंद्रशेखर शेळके यांची भेट घेतल्यानंतर टिळेकर यांच्या हॉटेलमध्ये दुपारचे पॅकलंच घेतले. हॉटेल चालक टिळेकर यांना आठवण म्हणून झाड भेट देण्यात आले. त्यानंतर ट्रेकर्स केंजळगडाकडे रवाना झाले.

पुढील ट्रेक 19 आणि 20 ऑक्टोबर- अधिक माहितीसाठी खालील इमेजवर क्लिक करा..

विविध रंगी फुलांनी सजलेल्या केंजळगडावरील पायवाटेने जाताना सर्वांचा उत्साह अधिकच द्विगुणित झाला. उंचावरुन दिसणारा सह्याद्री पाहून सर्वजण आनंदून गेले. भोर येथील आरोग्य कर्मचारी आणि युट्यूबर अजित वेणुपुरे यांनी भोर परिसरातील पर्यटन स्थळांची माहिती सांगितली.केंजळगडावरुन खाली आल्यानंतर सायंकाळी एकमेकांना हात देत सर्वजण सुखरुपपणे रायरेश्वरावर पोचले. यात अनेकांनी पहिल्यांदाच नाईट ट्रेकचा अनुभव घेतला.रायरेश्वर पठारावर सर्वांची टेंटमध्ये मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली होती. रायरेश्वर फोर्ट कॅपिंगचे सचिन जंगम आणि त्यांच्या कुटूंबीयांनी जेवणाची व्यवस्था केली होती. रात्री सह्याद्रीतील मुसळधार पाऊस अनुभवला.

रविवारी सकाळी फ्रेश झाल्यानंतर सर्वांनी रायरेश्वराचे दर्शन घेतले. ज्या ठिकाणी साक्षात छत्रपती शिवरायांची आपल्या मावळ्यांसह हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती, तिथे सर्वजण नतमस्तक झाले. इको फ्रेंडली क्लबच्यावतीने सर्वांना पर्यावरण संवर्धनाची शपथ देण्यात आली. इको फ्रेंडली क्लबचे सदस्य प्रतीक पाटील यांनी शपथेचे वाचन केले.त्यानंतर ट्रेकर्स रायरेश्वरावरील सात रंगाची माती पाहण्यासाठी गेले. एकाच परिसरात सात रंगांची माती पाहून सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले. रायरेश्वरावरुन दिसणारे निसर्ग सौंदर्य खुपच मस्त होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत सर्वजण पुन्हा मंदिराजवळ पोचले. दुपारचे जेवण करुन सर्वांनी रायरेश्वराचा निरोप घेतला.

सायंकाळी निसर्गप्रेमींचा हा जथ्था निगुडघर गावाकडे रवाना झाला. प्रसन्न आलाटे यांच्या आलाटेज गेस्ट हाऊसमध्ये रात्रीच्या जेवणाचे छान नियोजन करण्यात आले होते. जेवणानंतर सोलापूर आणि पुण्यातील निसर्गप्रेमींनी एकमेकांचा निरोप घेतला. इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक, वसुंधरा मित्र परशुराम कोकणे, समन्वयक सटवाजी ऊर्फ अजित कोकणे, पुण्याचे समन्वयक महेंद्र राजे, स्वाती इंगळे-भोसले, प्रसाद मुगळे, हॅपी टू हेल्प फाउंडेशनचे संस्थापक मदन पोलके, महसुल कर्मचारी माधव वडजे, समर्थ देशपांडे, प्रतीक पाटील, सोनाली थिटे, सोहम थिटे, शाम भराडीया, संतोषकुमार तडवळ, राम जाधव, नागेश स्वामी, विवेक वाले यांच्या नेतृत्वाखाली संतोष घुगे, शशांक सरदेशमुख, श्रीरंग सराफ, पल्लवी डिंगरे, श्रुती सिध्दापुरमठ, स्वानंदी देशपांडे, प्रणव सिध्दापुरमठ, नचिकेत काकडे, श्वेता काकडे, रसिका काकडे, आर्या गोरटे, अपुर्णा दामले, ऐश्वर्या गुमटे, ओंकार मोहोळकर, आयुष दिवाणजी, अन्वय देशपांडे, स्मीता बिराजदार, स्वप्नील जाधव, स्वाती जाधव, आदित्य गाडेकर, आर्यन कवडे, वरदा कुलकर्णी, ऐश्वर्या कदम, शिवानी वळसंगे, सई कोकाटे, आरती जतकर, पल्लवी कदम, कार्तिकी कदम, दिप्ती कदम, वैष्णवी कोकाटे, मयुरी जोशी, अर्पिता फडतरे, स्नेहल फडतरे, ऋतुजा फडतरे, सुकन्या सरवदे, प्रज्योत पालम, ऋषिकेश होनमुर्गी, रोहन कामुर्ती, विशाल मादगुंडी, पवन विजापुरे, संकेत पोलके, मंगेश माने, राहुल जगताप, सोनाली जगताप, प्रा. श्रीधर चव्हाण, सुरेश नारायणकर, अजय परांडकर, सौरव बटगिरी, श्रेयश भांजे, दयानंद आडके, जयश्री आडके, ओंकार आडके, विकास ढाले, जकराया डवले, जसपाल काळे, वैष्णव शिंगन, स्पंदीता पुजारी, प्रभाकर इरशेट्टी, राघवेंद्र पिल्लई, शिवकुमार राऊतराव, मयुर दुदगी, श्रीकृष्ण माढेकर, गायश्री माढेकर, सुश्मिता अग्रवाल, संपदा देशपांडे, डॉ. सृष्टी शहा, समृध्दी कदम, जागृती स्वाती, गिरीष स्वामी, धुव्र बाफना, मयुर दुदगी, किर्ती भराडीया, श्रेया भराडिया, हितेश भराडीया, वेदांत सारडा, अक्षत संकलेचा, यश मुंदडा, पुणे येथील सदस्य वंदना भालेराव, श्रेया गायकवाड, प्रिया चव्हाण, सुजाता पाटील, सोनाली जाधव, दिप्ती जाधव, गार्गी जाधव, रक्षा गोरटे, मुक्ता गोरटे, श्रध्येद दानी, सन्मित रणदिवे, व्यंकटेश मादम, केशव गोयल, आस्था माने, आर्या माने, पल्लवी मुगळे, प्रणवी मुगळे, ऋत्विक पाटील, विश्वजीत भरले, समीक्षा यरवार, सांगली येथून आलेले प्रा. अमोल पाटील, औरंगाबाद येथून आलेल्या रेवती देशपांडे, कोल्हापूर येथून आलेले राम शेंदारकर यांनी या निसर्गभ्रंमतीमध्ये सहभाग नोदविला.

पुढील ट्रेक 19 आणि 20 ऑक्टोबर- अधिक माहितीसाठी खालील इमेजवर क्लिक करा..

10 ऑक्टोबर हा जागतिक मानसिक आरोग्य दिन होता. ट्रेकिंग करताना शारीरिक स्वास्थ महत्त्वाचे आहेच परंतु त्याहीपेक्षा मानसिक स्वास्थ चांगले असणे आवश्यक आहे. जागतिक आरोग्य मानसिक दिनानिमित्त मला हे स्पष्ट करावेसे वाटते की, अशा ट्रेकिंग मुळे आपले मानसिक स्वास्थ्य चांगले होण्यास खूप मदत होते आणि महत्वाचे म्हणजे इतक्या प्रचंड म्हणजे 120 जणांच्या ग्रुप मध्ये ट्रेकिंग करताना एक वेगळी ऊर्जा, एक वेगळा उत्साह निर्माण होतो. दीड ते दोन वर्ष लॉक डाऊन मुळे घरात आपण सर्वजण असल्यामुळे आपले  मानसिक आरोग्य  खालावण्याची शक्यता आहे. परंतु अशा ट्रेकिंग मुळे हे मानसिक स्वास्थ्य नक्कीच उंचावले आहे. इको फ्रेंडली क्लब च्या माध्यमातून आपण अशा ट्रेकिंगचा आनंद घेतला. केंजळगड रायरेश्वर हे ट्रेकिंग आपल्याला खूप उत्साह देऊन गेले खूप ऊर्जा मिळाली आणि अनेक मित्र अनेक मंडळी यांची ओळख झाली. सोलापुरातून नव्वद ट्रेकर, पुण्यातून 24 ट्रेकर कोल्हापुरातून काही ट्रेकर असे सर्व मिळून साधारणपणे 115 ते 120 ट्रेकर सहभागी झाले होते. त्यामुळे सगळ्यामध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण झाली होती पुण्यातल्या ट्रेकरची ऊर्जा पाहून आम्हाला खूप आनंद झाला. त्यांच्याकडून ह आम्हाला बरंच काही शिकायला मिळालं. मी कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी अनेक वेगवेगळ्या सहली अरेंज केलेल्या आहेत परंतु ट्रेकिंगचा मात्र हा माझा पहिलाच अनुभव होता. सहली अरेंज करणं अतिशय सोप आहे परंतु ट्रेकिंगची ही अरेंजमेंट मात्र  कठीण वाटते आणि ही कठीण गोष्ट आपले इको-फ्रेंडली चे सर्व सदस्यांनी अतिशय व्यवस्थित रित्या सोपी केली. त्यांचं खूप कौतुक आणि आभार. इको फ्रेंडली क्लब च्या सर्व सदस्यांमध्ये जी ऊर्जा दिसली, जी एकता दिसली ती खूप वाखाणण्याजोगी आहे. असे मला वाटते. इको फ्रेंडली क्लब च्या प्रत्येक सदस्यांमध्ये काही ना काही वेगळे वैशिष्ट्य मला जाणवले आणि त्यांच्याकडून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले. हा केंजळगड रायरेश्वर ट्रेक अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वी झालेला आहे. आणि आम्हाला खूप आनंद देऊन गेलेला आहे. खूप उत्साह देऊन गेलेला आहे. त्याबद्दल परत एकदा सर्व इको फ्रेंडली क्लब च्या सदस्यांचे मनापासून आभार धन्यवाद.
- प्रा. श्रीधर चव्हाण, सोलापूर
--
ट्रेक यशस्वी झाला. एखादे काम यशस्वी करायची असेल तर त्या कामात नियोजन कार्य करण्याची योग्य पद्धत क्षमता आणि कौशल्य लागते ते सर्व गुण आम्हाला या इको फ्रेंडली क्लबच्या सदस्यांमध्ये दिसून आली ट्रेकमध्ये आलेल्या नैसर्गिक अडचणीवर सुद्धा त्यांनी मात करून प्रत्येकांची काळजी घेतली टेन पर्यंत जेवण पोहोचवले सर्वांची राहण्याची सोय केली विविध ठिकाणाहून आलेल्या मंडळीसुद्धा खूप चांगले व प्रेमळ होते खूप मजा आली दोन दिवस आम्ही निसर्गाच्या कुशीत होतो येथील हिरवा शालू नेसलेली डोंगर घाट नदी झरे धबधबा शुद्ध हवा हे पाहून डोळे प्रसन्न झाले मनाला आनंद मिळाला हे सर्व पाहून परत परत इको फ्रेंडली चा सहवास हवाहवासा वाटतो त्यांच्या प्रत्येक ट्रेकमध्ये परत परत सहभागी व्हावे आणि निसर्ग आणि इतिहासाचा आनंद घ्यावा कसा वाढतो आपल्या सोलापुरात परशुराम कोकणे सरांनी सर्व पुढाकार घेऊन या आविष्काराला सुरुवात केली त्यांचा आम्हाला खूप खूप अभिमान वाटतो.
- सौ. जयश्री आडके, 
सोलापूर