अर्र... आर्चीचे ‘हे’ फोटोज पाहून चाहते झालेत नाराज!

अर्र... आर्चीचे ‘हे’ फोटोज पाहून चाहते झालेत नाराज!

सोलापूर : सर्वांची लाडकी अभिनेत्री आर्ची ऊर्फ रिंकू राजगुरु हिने काही दिवसांपूर्वी आपल्या फेसबुक पेजवर दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आर्चीचा म्हणजेच रिंकूचा वेगळा लूक पाहायला मिळत आहे. या फोटोवर तिच्या चाहत्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. चला तर पाहूया काय म्हटलंय आर्चीच्या चाहत्यांनी..

सैराट चित्रपट येण्याच्या आधीपासूनच आर्चीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. रिंकूही मूळची आपल्या सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील अकलुजची आहे, हे तुम्हाला माहिती असेलच. आजवर तिने 3 मराठी चित्रपटात काम केले आहे. त्याची नावे सैराट, कागर आणि मेकअप अशी आहेत. विशेष म्हणजे रिंकूने मान्सू मिलन्गय या कन्नड चित्रपटातही अभिनय केला आहे. प्रदर्शनासाठी सज्ज असलेल्या नागराज मंजुळे यांच्या झुंड या चित्रपटातही रिंकूची भूमिका आहे. अलीकडेच हॉटस्टावर प्रदर्शित झालेल्या हान्ड्रेड या वेब सिरीजमध्येही रिंकूने अभिनेत्री लारा दत्तासोबत काम केले आहे. 

काही दिवसांपूर्वीच रिंकूने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर काही फोटोज शेअर केले आहेत. सोबत इंग्रजीमध्ये Sitting alone and enjoying your own company is better than being surrounded by fake people हे वाक्यही शेअर केले आहेत. चाहत्यांनी रिंकूचे हे फोटोज पाहून काहीशी नाराजी व्यक्त केली आहे. रिंकू तू सैराटमध्ये होतीस तशीच छान दिसत होती हा लुक नाही आवडला.. असे एका चाहत्याचे म्हणणे आहे. 

रिंकू तुम्ही तर खूप म्हातारी दिसू लागल्या वजन कमी करून.., कायच्या काय दिसतेस बे... झिर्रो फिग्गरच्या नादात म्हातारी केली तुला इंडस्ट्रीने.., नको टाकु असले लुकडे फोटो... आर्ची.....कडक...तु कोण?, रिंकू राजगुरु तुम्ही फक्त जाड गुटगुटीत छान दिसता.. आणि साडीत खुप सुंदर दिसता.., रिंकु तु चांगली दिसत नाहीस... सैराटमधली आर्चीच छान दिसत होती. खुपच चेंज झालाय आता एकदम सिंपल दिसू राहिली.. हे काही कॉमेंट्स आहेत. 

चाहत्यांना न आवडलेले फोटोज या बातमीच्या खाली जोडलेले आहेत. हे फोटोज पाहून, बातमी वाचून तुमची काही प्रतिक्रीया असेल तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा..