फ्लॅट आणि ऑफिस परिसरात वाढली पक्षांची रेलचेल

फ्लॅट आणि ऑफिस परिसरात वाढली पक्षांची रेलचेल

सोलापूर : व्हिडीओ एडिटर, मोशन फिल्म स्टुडिओचे संचालक, इको फ्रेंडली क्लबचे सदस्य सचिन जगताप यांनी पक्षी संवर्धनासाठी केलेले प्रयत्न आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या घराजवळ आणि कार्यालयाच्या परिसरात विविध पक्षांची रेलचेल वाढली आहे. 

सचिन जगताप यांनी पक्षी संवर्धन आणि पक्षी निरीक्षण या संदर्भात लिहिलेला लेख पुढील प्रमाणे -

मित्रांनो, सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की,
आजवर पशु-पक्षी यांचे संवर्धन व्हावे यासाठी अनेक प्रयत्न मी करीत असतो त्यासाठी आवश्यक काही गोष्टींचा उपयोग मी करीत असतो तर काही गोष्ठी या आपल्या पर्यावरणावर निगडित होत असतात..

आजवर आपण पाहिलं की चिमणी संवर्धनासाठी मी माझ्या फ्लॅटच्या गॅलरी मध्ये अनेक कृत्रिम चिमणी घरटे करून लावल्यामुळे सतत चिवचिवाट निर्माण होऊन आजवर अनेक पिल्लांना जीवदान मिळून ती निसर्गाच्या सानिध्यात उडुन गेली आहेत आणि आताही जात आहेत... पहिल्या लॉकडाऊनमध्ये तर रॉबिन अर्याा दयाळ या  चिमणीच्या पक्षांनी माझ्या अपार्टमेंट खाली पार्कींग मध्ये लावलेल्या माझ्या टू व्हीलर गाडीच्या पुढे फ्रंट काचेच्या जवळ काही पिल्लांनी जन्म दिला होता आणि ते सुखरूप आपल्या स्थानी उडून गेली..
असे एक ना अनेक गोष्ठी सांगण्या सारख्या आहेत...

आता एवढचं नाहीतर काही दिवसांपूर्वी माझ्या मोशन फिल्म स्टुडिओ येथील सारखी चहल पहल असलेल्या गॅलरी मध्ये इंटरनेट च्या वायरी गुंडाळलेल्या बॉक्स वर टिपकेदार मुनिया(Spotted Munia) या प्रकारच्या पक्षांनी घरटं विणायला सुरुवात केली आणि अतिशय सुंदर फुटबॉलच्या आकाराचे घरटं या चिमण्यांनी बनवलेले आहे...

माझ्या गॅलरी च्या बाजूलाच 2 मोठी डेरेदार वृक्ष असताना या पक्ष्यांनी बहुतेक मी निसर्गप्रेमी असल्याचे त्यांना माहिती असावे त्यासाठीच मनुष्याची कोणतीही भीती मनात न ठेवता बिनधास्त पणे विश्वास ठेऊन ही जी कलाकृती त्यांनी केली त्यामुळे मला खूपच आनंद होत आहे दररोज सकाळी आणि जसा वेळ मिळेल तसा या पक्षांचे बारकाईने निरीक्षण मी करीत असतो त्यामुळे खूप काही शिकायला मिळाले... 

चला तर आज आपण जाणून घेणार आहोत, “ठिपकेदार मुनिया” या पक्षाबद्दल...
ठिपकेदार मुनिया हा भारतात आढळणारा सामान्य पक्षी आहे...या पक्ष्याचे शास्त्रीय नाव Lonchura Punctulata तर इंग्लिश मध्ये याला Spotted Muniya या नावाने देखील ओळखले जाते... या पक्षाला हिंदीमध्ये तेलिया मुनिया सिनेवाज या नावाने पण संबोधले जाते... 
ठिपकेदार मुनिया हा साधारण दहा सेंटिमीटर आकारमानाचा चिमणी सारखा दिसणारा पक्षी आहे...ठिपकेदार मुनियाची मादी आणि नर दिसायला सारखेच असतात मुख्यत फिक्कट तपकिरी रंगाचे असतात वीण काळात नर गडद तपकिरी रंगाचा होतो यावर असलेले काळे-पांढरे ठिपके यांची महत्त्वाची ओळख आहे...
थव्याने राहणे हे यांचे वैशिष्ट्य आहे ते एकाच परिसरात अनेक जोडपी आपली घरटी बांधून राहत असतात राजस्थान, पंजाब, हिमालयाचा काही भाग वगळता संपूर्ण देशभर दिसून येणारा हा पक्षी असून त्याच्या आकारावरून आणि रंगावरून याच्या किमान दोन उपजाती आहेत ठिपकेदार मुनिया या पक्षाचे अन्न मुख्यतः शेतातील दाणे,  धान्य, छोटे किडे असे आहे त्यावर ते आपली उपजीविका करतात...

जुलै ते ऑक्टो बर हा ठिपकेदार मुनिया यांच्या वीणीचा काळ असून त्यासाठी गवतात किंवा झुडपात आपले घरटे बांधतात ... मादी एकावेळी शुभ्र पांढ-या रंगाची 4 ते 5 अंडी देते , नर-मादी मिळून अंडी उगविणे, पिल्लांचे देखभाल करणे, पिल्लांना खाऊ घालणे घरट्यांची साफसफाई करणे ही सर्व कामे करतात...

एखादा धोका जाणवला तर वेडा राघू टीर टीर  असा आवाज काढून जमिनीवर च्या पक्षाना सावधान करतो कि, लगेच सगळे पक्षी जमीनीवरून उडतात आणि पट्टी पट्टी असं मधुर आवाज करतात... तर मित्रांनो या पक्षाबद्दल ची हि माहिती जेवढी मला आहे ती दिली आहे...
अतिशय आनंदी वृत्तीचा हा ठिपकेदार मुनिया पक्षी पाहून माझ्या देहात सुखद लहरी संचारतात. धन्यवाद....!

हा पक्षी कसा असतो यासाठी मी क्लिक केलेली काही फोटोग्राफी...

आपला निसर्ग मित्र,
सचिन जगताप
मो. 9822092303