संभाजी नगर नामांतरासाठी संभाजी आरमार आक्रमक; एसटी बसवर लावले फलक

संभाजी नगर नामांतरासाठी संभाजी आरमार आक्रमक; एसटी बसवर लावले फलक

sambhaji aarmar news

सोलापूर : औरंगाबाद शहराला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देऊन संभाजी नगर नामांतर करावे अशी मागणी राज्यातील कोटयावधी शिवप्रेमी जनतेची आहे. संभाजी आरमार संघटनेने हा विषय लावून धरला असून आंदोलन उभे केले आहे. सरकारचे लक्ष या मागणीकडे वेधण्यासाठी संभाजी आरमारच्या वतीने सोलापूर बस स्थानकात औरंगाबाद शहराला जाणाऱ्या बसवर संभाजीनगरचा फलक लावण्यात आले. 

संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. याप्रसंगी बोलताना कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे यांनी छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्राचा स्वाभिमान असून आंदोलनाचा वणवा पेटण्यापुर्वी सरकारने जनभावना विचारात घेत औरंगाबादचे "संभाजीनगर" करण्याचे शहाणपण दाखवावा. 

या वेळी संभाजी आरमार चे जिल्हाप्रमुख गजानन जमदाडे, जिल्हासंघटक अनंतराव नीळ, संजय सरवदे,शहरप्रमुख शशिकांत शिंदे,शहरसंघटक अनिल छनत्रबंद,सागर संगवे,राज दवेवाले,सोमनाथ मस्के,संतोष कदम,संताजी जांभळे,गणेश ढेरे,प्रकाश बेले,सागर दासी,राजू रचा,प्रशांत नवले,प्रमोद माने उपस्थित होते.