संगमेश्वर कॉलेजमध्ये कोविड 19 प्रतिबंधक मोफत  लसीकरण शिबिराचे आयोजन

संगमेश्वर कॉलेजमध्ये कोविड 19 प्रतिबंधक मोफत  लसीकरण शिबिराचे आयोजन

सोलापुर - राष्ट्रीय सेवा योजना विभाग संगमेश्वर कॉलेज सोलापुर आणि दाराशा नागरी आरोग्य केंद्र आणि रामवाडी आरोग्य केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने 03 दिवसीय कोविड 19 मोफत लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या लसीकरण शिबिराचे उदघाटन संगमेश्वर एजुकेशन सोसायटीचे सचिव मा. श्री धर्मराज काडादी सर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी कॉलेजच्या प्राचार्या मा.डॉ. एस.व्ही. राजमान्य मैडम कला, विज्ञान आणि वाणिज्य या विभागाचे उपप्राचार्य,  वैद्यकीय अधिकारी डॉ वाळवेकर मैडम,डॉ पवार मैडम, प्राध्यापक, शिक्षकेतर कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी, पालक, रासेयो स्वयंसेवक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. पहिल्याच दिवशी लसीकरणा साठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

हे मोफत लसीकरण शिबिर दिनांक 25 ऑकटोबर ते 27 ऑकटोबर 2021 या कालावधीत दररोज सकाळी 10.00 ते दुपारी 02.00 वा पर्यंत आयोजित करण्यात आलेले आहे. तरी या मोफत लसीकरण शिबिराचा लाभ सर्व विद्यार्थी,पालक, प्राध्यापक,शिक्षकेतर कार्यालयीन कर्मचारी यानी घ्यावा असे आव्हान मा. श्री धर्मराज काडादी सर  यांनी केले आहे.

या कार्यकमाचे सुत्रसंचालन व नियोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक प्रा. ए.व्ही. साखरे  यांनी केले व हे शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे अनिकेत फताटे, बसवराज कोगणुरे, ऋषिकेश शिवशेट्टी,कृतिका गजघाटे,बाळासाहेब कांबळे, निलेश उंकी, पूजा गजघाटे, शुभम गायकवाड, अर्पिता बंगेरा ,लक्ष्मीपुत्र बगले, विनायक सुरूवसे, ओंकार निम्बर्गी महांतेश देसाई चिदानंद साखरे, स्नेहा माशाळ‌ ,सचिन नायकवाडी  सुप्रिया शेंडगे स्वयंसेवक यांनी  परिश्रम घेतले.