शरद पवारांच्या साताऱ्यातील सभेची वर्षपूर्ती; ‘राष्ट्रवादी’कडून सेलिब्रेशन!

sharad pawan ncp news

शरद पवारांच्या साताऱ्यातील सभेची वर्षपूर्ती; ‘राष्ट्रवादी’कडून सेलिब्रेशन!
sharad-pawar-ncp-news

सोलापूर : १८ ऑक्टोबर २०१९ रोजी निवडणुकीच्या रणधुमाळीत भर पावसात झालेली खा. शरद पवार यांची सातारा येथील सभा म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीसाठी एक अविस्मरणीय अनुभव आहे
.
मुसळधार पावसाची पर्वा न करता शरद पवार जनतेशी संवाद साधायला उभे राहिले आणि या सभेने इतिहास घडवला. निवडणुकीचे चित्र पालटले आणि राज्यात सत्तांतर घडले. या ऐतिहासिक सभेला आज १८ ऑक्टोबर २०२० रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सभेच्या आठवणी ताज्या करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विशेष तयारी केल्याचे दिसून येत आहे. साताऱ्यातील सभेच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर केल्या जात आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर वरिष्ठ नेते शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसविषयी काय म्हणाले होते या संदर्भातील एक व्हिडिओ बनविण्यात आला आहे. साताऱ्यातील सभेने कशाप्रकारे इतिहास घडविला हे यातून दाखविण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत पेजवर केलेली पोस्ट खालील प्रमाणे -
‘त्यांनी पवारसाहेबांविरुद्ध रणनीती आखली... त्यांचे पैलवान म्हणे तेल लावून तय्यार होते. त्यांनी शड्डू ठोकले पण समोर पैलवानच दिसत नव्हते अशी त्यांची दर्पोक्ती ते म्हणाले, शरद पवार संपले, तुम्ही महाराष्ट्राला काय दिलं, असंही साहेबांना विचारायचं धारिष्ट्य त्यांनी दाखवलं. पवारसाहेबांचं राजकारण संपलं... असंही अहंकारानं खिजवलं.
पण १८ ऑक्टोबर २०१९ रोजी साताऱ्यात काहीतरी विलक्षण घडलं. साक्षात वरुणराजा पवारसाहेबांच्या स्वागताला धावून आला आणि या पावसात साहेबांच्या सोबतीनं इथली जनता चिंब भिजली पण दिल्ली मात्र थिजली...’
सातारा येथील मुसळधार पावसातील सभेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. संकट कितीही मोठे असुदेत, परिस्थिती कितीही बिकट असुदेत, वय 80 जरी असले त्या संकंटाला हरवण्याची संघर्ष करण्याची जिद्द, धाडस व लढण्याची प्रेरणा आम्हा कार्यकर्त्यांना शरद पवार साहेबांच्या भर मुसळधार पावसात केलेल्या भाषणामुळे मिळाली.
- संतोष पवार, कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर जिल्हा