थोरला मंगळवेढा तालीम तर्फे यंदा शिव सजावट स्पर्धा 

थोरला मंगळवेढा तालीम तर्फे यंदा शिव सजावट स्पर्धा 

थोरला मंगळवेढा तालीम तर्फे यंदा शिव सजावट स्पर्धा 
शिवजयंती घराघरात साजरी करण्याचे आवाहन 

सोलापूर : शिवजयंती निमित्त यंदा थोरला मंगळवेढा तालिमतर्फे शिव सजावट स्पर्धा २०२१ चे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंडळाचे आधारस्तम व विरोधी पक्षनेता अमोलबापु शिंदे आणि संकेतभाऊ पिसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. नववर्षाच्या आगमनाबरोबरच तमाम शिवप्रेमींच्या मनात शिवजन्मोत्सवाचे वेध लागतात . जन्मोत्सव म्हणजे शिवविचारांचा , शिवचरित्राचा जागर तमाम शिवप्रेमींच्या मनात घोंगावत असतो . आपापल्या मंडळांच्या देखावे , मिरवणुका , मर्दानी डायांचे प्रात्यक्षिके , विविध स्पर्धा , उपक्रम , या मध्ये तन - मन - धनांनी शिवप्रेमी गुतलेला असतो . लहानांपासून थोरांपर्यंत सर्व जाती - धर्माच्या कक्षा ओलांडून शिवप्रेमी शिवजन्मोत्सवाच्या सोहळ्यामध्ये सहभागी होत असतो.

कै.बाळासाहेब (आण्णासाहेब) शिंदे , कै . शिवाजीराव ( महाराज ) पिसे यांनी थोरला मंगळवेढा तालिमच्या माध्यमातून आजवर अनेक गौरवास्पद सामाजिक कार्यक्रम राबविले आहेत . त्यांच्या प्रेरणेतून त्यांच्या विचारांचा वारसा जपत पुढील पिढी कार्यरत आहे. दरवर्षी शिवजयंती उत्सव काळात थोरला मंगळवेढा तालिमतर्फे मिरवणुकीत सहभागी अधिकारी , कर्मचारी , आणि परगावचे शिवभक्त यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात शिवभोजनाचे नियोजन केले जाते . तसेच अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात . यंदा मात्र कोविडमुळे शिवजन्मोत्सव सार्वजनिकरित्या साजरा करता येणार नाही . या उत्सवावर निबंध आल्याने अमोल (बापु) शिंदे, संकेत (भाऊ) पिसे , प्रताप (भाऊ) चव्हाण, अनिकेत पिसे , प्रकाश अवस्थी , राम गायकवाड, सुनिल शेळके , सदानंद येलूरे , सागर पिसे , पृथ्वीराज दिक्षीत , दत्तात्रय मेनकुदळे , दत्ता खुर्द, समीर मुजावर, अविनाश हत्तरकी, बबलू कोकरे, राजशेखर हिरेहब्बू, अमोल कदम, अनंत येरणकाल्लू, गिरीश शेंगर, अमित पवार, दिनेश जगताप, आदी थोरला मंगळवेढा तालिमच्या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेऊन विचार - विनिमय करुन शिव सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

घर बसल्या शिवप्रेमींना श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करता यावी व त्यांचे जीवनचरित्र समजून घेता यावे , त्यांनी केलेल्या कार्याचा नवीन पिढीला परिचय व्हावा , तसेच त्यांच्या कल्पकतेला आणि सृजनशिलतेला वाव मिळावा , यासाठी थोरला मंगळवेढा तालिम संघा तर्फे शिव सजावट स्पर्धा २०२१ आयोजित करण्यात आली आहे . गौरी - गणपतीच्या उत्सवाप्रमाणे घरामध्ये शिवप्रतिमा अथवा मूर्तीची स्थापना करुन त्या समोर शिवकालीन ऐतिहासिक घटनांचे देखावे व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील कार्य , प्रसंग अथवा घटना या विषयावर आधारित सजावट करावयाची आहे . सदरची सजावट स्पर्धा ही गुरुवार , दिनांक १८ फेब्रुवारी २०२१ ते २१ फेब्रुवारी २०२१ दरम्यान संपन्न होणार आहे.

स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रथम पारितोषिक २१,००० , व्दितीय पारितोषिक १५,००० , तृतीय पारितोषिक ११,००० तसेच २,००० रोख रकमेचे दहा उत्तेजनार्थ पारितोषिके , स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात येणार आहे . तरी या स्पर्धेत शिवप्रेमींनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

या पत्रकार परिषदेला राजशेखर बुरकुल, राम गायकवाड आदी उपस्थित होते.

नियम व अटी :
१. सदरहू स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. 
२. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १५ फेब्रुवारी पर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे. 
३. स्पर्धेत नांव नोंदणी करणेसाठी ९ ८२२७५०१५७ , ९ ३७०४११४२२ , ८६५२७१५३७५ , या क्रमांकावर संपर्क साधावा.
४. सदरची स्पर्धा ही विनामुल्य असून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जात - धर्म - लिंग - वय यांची अट नाही. 
५. स्पर्धेचे कार्यक्षेत्र सोलापूर शहर परिसर आहे. 
६. स्पर्धकांनी त्यांचा देखावा हा मोबाईलमध्ये चित्रित करुन संयोजकांनी दिलेल्या नंबरवर पाठवायचा आहे. 
७. अंतीम फेरीत आलेल्या स्पर्धकांकडे परिक्षक स्वतः समक्ष भेट देऊन पाहणी करतील. तो पर्यंत आपले देखावे / कलाकृती / सजावट आहे त्याच स्थितीत ठेवणे बंधनकारक आहे.
८. परिक्षकांचा निर्णय अंतीम राहील.

पहा व्हिडीओ...