शिवसेना नगरसेवक मनोज शेजवालचा अटकपूर्व जामीन फेटाळला! वाचा सविस्तर..

शिवसेना नगरसेवक मनोज शेजवालचा अटकपूर्व जामीन फेटाळला! वाचा सविस्तर..

सोलापूर : शिवसेनेचे नगरसेवक मनोज शेजवाल यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

सोलापुरातील रेल्वे स्टेशन रोडवरील गुडलक स्टोअरच्या समोरील रेल्वे विभागाच्या मालकी हक्काच्या जागेत वरद विनायक स्टेशनचा राजा या गणपती मंदिराच्या पत्राशेड च्या बाजूस चिंचेच्या झाडाखाली शिवसेनेचे नगरसेवक मनोज शेजवाल याच्या सांगण्यावरून आरोपी गणेश शिवाजी पांढरे याने इलेक्ट्रिक मोटर ,इलेक्ट्रिक वजन काटा व एकूण 38 ज्वलनशील घरगुती गॅस टाकी त्याची रक्कम रुपये 42 हजार पाचशे व घरगुती वापरातील ज्वलनशील गॅस टाक्यातील गॅस वाहनांमध्ये इंधन म्हणून असुरक्षितपणे वापर करण्याकरता जवळ बाळगल्याचे आढळून आले आहे.

लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा स्थितीत मिळून आल्याने त्याचा भाऊ योगेश शिवाजी पांढरे हा त्यास मदत करत असल्याचे दिसून आल्याने व घरगुती गॅस वापरावयाच्या टाक्या ह्या आरोपी शिवाजी थिटे हा पुरवठा करत असल्याचे निदर्शनास आल्याने सदर प्रकरणात संजय प्रल्हाद शिरसागर सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सोलापूर यांनी आरोपी गणेश शिवाजी पांढरे राहणार बुधवार पेठ सोलापूर ,मनोज भास्कर शेजवळ राहणार सोलापूर ,योगेश शिवाजी पांढरे राहणार बुधवार पेठ सोलापूर, शिवाजी थिटे राहणार सोलापूर ,यांचे विरोधात सदर बाजार पोलिस स्टेशन या ठिकाणी फिर्याद दिली असता पोलिसांनी सदर आरोपीच्या विरुद्ध भारतीय दंड विधान कलम 285, 336, 379, 448, 451 ,सह 34 तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 चे कलम 3 व 7 प्रमाणे तसेच रेल्वे अॅक्ट 1989 चे कलम 147 प्रमाणे गुन्हा नोंदवला त्यामुळे आरोपी मनोज शेजवाल याला अटक होईल या भीतीने त्याने फरार होऊन त्याच्या वकिलामार्फत सोलापुरातील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री व्ही जी मोहिते साहेब यांचे न्यायालयात अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केला असता त्यात सरकार पक्षातर्फे तीव्र हरकत घेऊन जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत यांनी म्हणणे मांडले आणि सरकार पक्षाच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला की सदर आरोपी ने केलेले गुन्हे गंभीर स्वरूपाचे असून सदर आरोपी हा शिवसेनेचा विद्यमान नगरसेवक आहे आणि सदर नगरसेवकाच्या सांगण्यावरून इतर आरोपींनी सदरचा अपराध करून अवैध व्यवसाय केलेला आहे या गुन्ह्यातील आरोपी गणेश पांढरे हा अटक असून बाकी सर्व आरोपी फरार असून त्यांना अटक करून सर्व आरोपींमध्ये सदर व्यवसाय संदर्भात काही करार झाला आहे का व सदर व्यवसायातून त्यांनी किती प्रमाणात आर्थिक फायदा करून घेतलेला आहे याचा तपास करण्यासाठी सदर आरोपींची पोलिस कोठडी ची आवश्यकता आहे तसेच सदर आरोपीविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे विविध पोलीस स्टेशनला दाखल असून एकूण 11 गुन्हे मनोज शेजवाल या आरोपीच्या विरुद्ध दाखल असून त्यामध्ये खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे, दंगा करणे, लोकांची फसवणूक करणे ,स्त्रियांचा अनैतिक व्यापार करणे असेदेखील समाजविघातक गुन्हे या आरोपीच्या विरुद्ध दाखल असल्याने सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून तो सरकार पक्षावर दबाव आणून, साक्षीदारांना धमकावून ,सरकार पक्षाचा पुरावा फोडू शकतो त्यामुळे त्यांना कायद्याने अटकपूर्व जामीन देता येणार नाही असा युक्तिवाद केला असता सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून मे कोर्टाने सदर आरोपीचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळून लावला आहे सदर प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत व सहाय्यक सरकारी वकील दत्तू सिंग पवार यांनी काम पाहिले तर आरोपीच्या वतीने एडवोकेट स्वप्नील सरवदे यांनी काम पाहिले आहे.