कोरोनामुळे नागणसूर महाराजांनी रद्द केला गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम

कोरोनामुळे नागणसूर महाराजांनी रद्द केला गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम

नागणसूर : अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर तसेच अफजलपूर तालुक्यातील रेवूर येथील श्री गुरु बमलिंगेश्वर मठाचे मठाधिपती श्री ष.ब्र.श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजीनी कोरोना महामारी संसर्ग रोखण्यासाठी यंदा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम रद्द केला आहे.

रविवार दि.5 जुलै रोजी गुरुपौर्णिमा असल्याने शहर जिल्ह्यात विविध मठ मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते.  कोरोना महामारी रोगाची सर्वत्र पैलाव होऊ नये म्हणून नागणसूर महाराजांनी स्वत: यंदा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम रद्द केल्याचे सांगितले आहे. दरवर्षी  नागणसूर महाराजांची भक्तकल्याणासाठी व विश्वशांतीसाठी सामूहिक ईष्टलिंग महापूजा संपन्न होत असते. गुरुदर्शन आशिर्वाद घेण्यासाठी हजारो भक्तगण उपस्थित राहत असतात. यावर्षी भक्तांची गर्दी होऊ नये म्हणून संक्षिप्त पूजा,श्रीस रुद्राभिषेक, सहस्त्र बिल्वार्चन पूजा करणार असल्याचेही सांगितले.

भक्तांनी घरीच करावी पूजा..
शासनाचे नियम पाळून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्व भक्तांनी घरातच घरातील सर्वांना घेवून सद्गुरुंचे नामस्मरण करत ईष्टलिंग पूजा करुन गुरुपौर्णिमा साजरी करावे असे आवाहन श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजींनी केले आहे.