चिमणी पाडकामाविषयी सात दिवसाच्या आत आदेश देणार

चिमणी पाडकामाविषयी सात दिवसाच्या आत आदेश देणार

चिमणी पाडकामाविषयी सात दिवसाच्या आत आदेश देणार

जिल्हाधिकाऱ्यांचे सोलापूरच्या शिष्टमंडळाला आश्वासन

सोलापूर : सोलापूरकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या विमानसेवा आणि अनाधिकृत चिमणी पाडकामा विषयी सोलापूरातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेतली. ह्या आधी सदर शिष्टमंडळाने सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त, उपायुक्त, बांधकाम परवाना विभाग, निवासी उपजिल्हाधिकारी आणि सोलापूर शहर पोलीस आयुक्त यांच्या समवेत अनाधिकृत बेकायदेशीर चिमणी विषयी सातत्याने पाठपुरावा केला आणि सदर विषयावर सर्व तांत्रिक माहितीची देवाणघेवाण केली. संबंधित सर्व अधिकार वर्गाकडुन जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कार्यवाही करण्याचे ठोस आश्वासन प्राप्त झाले.

सोलापूरच्या तज्ञ शिष्टमंडळाने होटगी रोड येथील विमानसेवेस अडथळा असलेल्या श्री सिद्धेश्वर सह.साखर कारखान्याच्या अनाधिकृत बेकायदेशीर चिमणी पाडकामाविषयी जिल्हाधिकारी यांना माहितीच्या अधिकारात प्राप्त दस्तऐवजांचा संचाचे प्रत दिले. ह्या प्रसंगी सोलापूरच्या विकासात अडथळा असलेली बेकायदेशीर अनाधिकृत चिमणी पाडकाम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अश्या मागणीचे निवेदन सर्व सोलापूरकरांच्या वतीने तज्ञ शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना दिले. जिल्हाधिकारी यांनी सोलापूरातील तज्ञ शिष्टमंडळाला सात दिवसात चिमणी पाडकामा विषयी आदेश देण्या संबंधीचे सकारात्मक आश्वासन दिले.

भारत सरकारच्या नागरी उड्डयन मंत्रालय, ए.ए.आय. आणि डि.जी.सी.ए.च्या सर्व तांत्रिक आणि इतर महत्त्वाच्या निकषांवर होटगी रोड वरील विमानतळ हे अत्यंत उत्तम स्थितीत असल्याचा निर्वाळा सर्व संस्थांनी दिली आहे. अडचण आहे ती विमानसेवेस अडथळा निर्माण करणार्‍या श्री सिद्धेश्वर सह.साखर कारखान्याची अनाधिकृत चिमणी, ज्या विषयी मा.सोर्वोच्च न्यायालयाने मागील वर्षी निर्णय दिला आहे, त्याचीच अमलबजावणी होण्यासाठी सोलापूरच्या तज्ञ शिष्टमंडळाची गेल्या एक महिन्यापासून संबंधीत सर्व अधिकार वर्गासमवेत बैठका, निवेदन आणि चर्चा केली.

आज जिल्हाधिकारी यांच्या समवेतच्या चर्चा आणि निवेदन देण्याप्रसंगी सोलापूरच्या तज्ञ शिष्टमंडळात गिरिकर्णिका फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री.विजय कुंदन जाधव, विमानतळ सल्लागार समितीचे माजी सदस्य केतनभाई शहा,वेकअप सोलापूर फौंडेशनचे अध्यक्ष अभियंता मिलिंद भोसले,उद्योजक संजय थोबडे,मर्चंटनेव्हीचे विश्वनाथ गायकवाड,सोलापूर सोशलचे ऍडव्होकेट प्रमोद शहा,आय.टी. इंजिनियर आनंद पाटील,स्मार्ट सोलापूर फेडरेशनचे गणेश शिलेदार, योगीन गुर्जर, श्रीनिवास वैद्य उपस्थित होते.