हातभट्टी विकणार्‍या सिध्दुला पाठवले येरवड्यात! वाचा कारनामे...

हातभट्टी विकणार्‍या सिध्दुला पाठवले येरवड्यात! वाचा कारनामे...

सोलापूर : सोलापूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार सिद्राम ऊर्फ सिघ्दु संभाजी बंडगर (वय 43 वर्षे रा. अमराई, हौसेवस्ती, सोलापूर यास एमपीडीए अधिनियम , 1 9 81 अन्वये दि .01 / 0 9 / 2021 रोजी स्थानबध्द जारी करुन त्यास स्थानबध्द केले आहे.

सिद्राम ऊर्फ सिप्दु संभाजी बंडगर हा त्याच्या साथीदारासह स्वत : च्या आर्थिक फायद्यासाठी फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीतील परिसरात गेल्या अनेक वर्षापासून अवैध गावठी हातभट्टी दारुच्या व्यवसायात गुंतलेला आहे. तो महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमातील तरतुदीचा भंग करुन हातभट्टी दारुची वाहतुक आणि विक्री करत असल्याबद्दल त्याचे विरुद्ध एकूण 10 व भादवि अन्वये 02 गुन्हे दाखल आहेत. तसेच त्यास त्याच्या हातभट्टी दारु व्यवसायापासून परावृत्त करण्यासाठी सन 2020 मध्ये क.9 3 महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमानुसार प्रतिबंधक कारवाई केली आहे. केलेल्या प्रतिबंधक कारवाईचा त्याच्या गुन्हेगारी वर्तनावर कोणताच परिणाम झाला नाही. त्याने पुन्हा अवैध हातभट्टी दारुचा व्यवसाय चालूच ठेवला आहे.

सन 2021 मध्ये अगदी अलीकडील कालावधीत त्याने महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमातील तरतुदीचा भंग करुन 06 गुन्हे केले आहेत. सिद्राम ऊर्फ सिध्दु संभाजी बंडगर हा हातभट्टी दारु व्यवसायाचा मालक आहे. हातभट्टी दारुची वाहतुक करताना तो आणि त्याचे साथीदारासह त्यांची वाहने निष्काळजीपणे चालवून रस्त्यावरुन जाणा - या लोकांच्या आणि परिसरातील रहिवाशी यांच्या जिवीतास धोका निर्माण करत आहे. त्याच्या बेकायदा व्यवसायास विरोध करणारे किंवा पोलीसांना माहिती देणारे लोकांना तो त्याच्या साथीदारासह उघडपणे शस्त्रासह मारहाण करतो. अशा प्रकारची गुन्हेगारी कारवाई करुन सिद्राम ऊर्फ सिध्दु संभाजी बंडगर याने परिसरात दहशत निर्माण करुन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण केली आहे.

सिद्राम ऊर्फ सिध्दु संभाजी बंडगरयाच्या अवैध हातभट्टी दारुच्या व्यवसायामुळे फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीतील सार्वजनिक सुव्यवस्था बाधीत होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्यामुळे, भविष्यात सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी त्याच्याविरुध्द एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली आहे. सिद्राम ऊर्फ सिध्दु संभाजी बंडगर याच्याविरुध्द वेळोवेळी कारवाई करुनही त्याच्या गुन्हेगारी वर्तनामध्ये कोणतीच सुधारणा झाली नाही. त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी त्यास एमपीडीए अधिनियम , 1 9 81 अन्वये स्थानबध्दतेचे आदेश निर्गमित केले आहेत . आदेशाची बजावणी करुन पुणे येथील येरवडा कारागृहात रवानगी करण्यात येत आहे. शहरात सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार सर्व पोलीस ठाणे हद्दीतील अवैध व्यवसाय करणारे, सराईत गुंड, समाजविघातक कृत्य करणार्‍यांची यादी तयार करण्यात आली आहे. अशाप्रकारची कारवाई यापूढेही अशीच चालू राहणार आहे, असे पोलीस उपनिरीक्षक वीशेंद्रसिंग बायस यांनी कळविले आहे.