बिबट्या पुन्हा ॲक्टिव्ह; शेतात काम करणाऱ्या महिलेवर झडप!

बिबट्या पुन्हा ॲक्टिव्ह; शेतात काम करणाऱ्या महिलेवर झडप!

solapur Leopards reactivated

सोलापूर : करमाळा तालुक्यात तीन जणांचे बळी घेतलेल्या नरभक्षक बिबट्याने आज गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास नरसोबावाडी सांगवी जवळ भागात शेतात काम करणाऱ्या दिनकर पाटील यांच्या पत्नीवर झडप मारली. यावेळी त्यांनी बिबट्याची झडप चुकवली यावेळी उपस्थित असलेल्या लोकांनी दगडाचा भडीमार संबंधित नरभक्षक बिबट्या व केल्यानंतर तो बिबट्या तिथून पळून गेला.

पळून गेल्यानंतर तो बिबट्या रामचंद्र महादेव कदम यांच्या उसाच्या शेतात गेला. दुपारी दीड वाजल्या नंतर ही बातमी वन विभाग अधिकाऱ्यांना त्यांना कळल्यानंतर व सत्तर-ऐंशी कर्मचाऱ्यांनी या या उसाच्या पाच एकराच्या फडाला घेराव घातला. शार्प शूटर सायंकाळी सहाच्या पुढे उसाच्या फडात घुसले आहेत रात्री 9 वाजेपर्यंत विभागाने प्रयत्‍न करून त्याला जेरबंद करण्याच नियोजन केले पण त्यांना यश आले नाही.

आमदार रोहित पवार यांनी सायंकाळी घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी उपस्थित वन विभाग अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना योग्य त्या सूचना दिल्या. कसल्याही परिस्थितीत बिबट्याचे संकट करमाळा तालुक्यावरून टाळण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्राणाची शिकस्त करून हा बिबट्या जेरबंद करावा अशा सूचना दिल्या‌ आहेत.

बिबट्याच्या हल्ल्यासंदर्भात माहिती देताना आमदार रोहित पवार -