अतिक्रमण हटवण्याआधी मुदत द्या, अन्यथा.. आम आदमी पार्टी दिला इशारा

अतिक्रमण हटवण्याआधी मुदत द्या, अन्यथा.. आम आदमी पार्टी दिला इशारा

सोलापूर : महानगरपालिकाच्या वतीने नाल्यातील बेकायदेशीर बांधकामाच्या नावाने अतिक्रमण काढण्याची कारवाई होत आहे. नाल्यावर दोन्ही बाजूला ६ मीटर अंतर पाहिजे असे सांगत अतिक्रमण हटविण्याचे काम चालू आहे. घोंगडे वस्ती येथे काल १४ पक्की घरं पाडुन त्यांचे संसार ऊघड्यावर आणले गेले. तेथील रहिवाश्यांना महाराष्ट्र अधिनियम १९४९ कलम ५३ अनुसार नोटीस बजावण्यात आले आहेत. लोकांना अल्पावधि नोटीसा बजावण्यात आले आहेत. तरी आयुक्तांना निवेदन देऊन ही विनंती करण्यात आली आहे की मा. आयुक्त स्वतः स्पाॅट वर जाऊन सर्वेक्षण सुनिश्चित करूनच कायदेशीर कारवाई करावे. ज्या लोकांवर कारवाई होत आहे ते लोक तेथे वीस वर्षापासून राहत आहेत. या लोकांवर अन्याय होत आहे यांना कमीत कमी सहा महिने अगोदर नोटीस द्यायला हवी होती व पर्यायी राहण्याची व्यवस्था करूनच अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करायला पाहिजे होते असे आम आदमी पार्टी च्या निवेदनात म्हंटले आहे. 

मा. आयुक्तांनी काम सोपवले म्हणून अधिकारी कोणतेही आवश्यक सर्वेक्षण व व्यवस्थित पाहणी न करता गोर गरीब अशिक्षित जनते वर कार्यवाही करताना दिसत आहेत. तिथली सद्यपरिस्थिती वेगळी आहे. नाल्याचे पाणी तिथे जमत नाही किंवा त्या घरांमुळे पाणी तुंबुन पुरपरिस्थिती निर्माण होत नाही. गेल्या २० वर्षात तिथे ह्या घरांमुळे पाणी निचरा ची अडचण नसुन लोकांना कोणतेही त्रास झाले नाही. 

पण तरी जर कार्यवाही करायची असल्यास ६ महिन्याचे मुद्दत दिले पाहिजे होते आणि पर्यायी राहण्याची सोय करूनच अतिक्रमण काढायला पाहिजे होते. 

तसेच आयुक्तांना विनंती करण्यात आले आहे की पुढील कारवाईसाठी स्वतः आयुक्तांमार्फत तिथले सर्वेक्षण सुनिश्चित करण्यात यावे व मानवतेचा विचार करत योग्य निर्णय घेण्यात यावे.  

 
सध्या सुरु असलेली अतिक्रमण हटाव मोहिम थांबवण्यात यावी. जर पुरेसे कालावधी ची मुदत न देता अचानक कार्यवाही करण्यात आली तर बाधित रहिवाशी व त्यांच्या घरचे सामान मा. आयुक्त यांच्या घरच्या कंपाऊंड मध्ये मांडून आप तर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा आम आदमी पार्टी चे शहराध्यक्ष मो. अस्लम शेख यांनी दिला आहे व सर्व बाधित नागरिकांना अपील केली आहे की ज्यांना ज्यांना अश्या अल्पावधि नोटीसा येत आहेत त्यांनी आम आदमी पार्टी ला संपर्क साधावा. पार्टी त्या नोटिसीस ना उत्तर देण्यात मदत तर करेलच आणि ह्या कायदेशिर लढ्यात त्यांच्या पाठीशी राहुन न्याय मिळवुन देईल.

या वेळेस, आप सोलापूर शहर उपाध्यक्ष हेमंत जाधव, शहर उपाध्यक्ष जैनुद्दीन शेख, इलियास शेख, निहाल किरनळ्ळी आदी उपस्थित होते.