भरधाव कारला आग! वाचा कुठे घडली घटना..

भरधाव कारला आग! वाचा कुठे घडली घटना..

solapur car aag news 

सोलापूर : सोलापूर - पुणे महामार्गावर कारला आग लागल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. या घटनेत कार पूर्णपणे जळाली असून कोणीही जखमी झाले नाही. जळालेल्या कारची किंमत अंदाजे साडेचार लाख असल्याचे सांगण्यात आले आहे.

पुणे येथून तुळजापूरच्या दिशेने कार निघाली होती. कारमध्ये चार प्रवासी होते. सोलापूर - पुणे महामार्गावर कारंबा नाका डी मार्टच्या समोर शॉर्ट सर्कीट होवून रेनॉल्ट क्विड कारमधून धूर निघू लागला. मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास हा प्रकार घडला. काही वेळातच कारला आग लागली.

आग लागल्यानंतर कारमधील प्रवाशी गोंधळून गेले. त्यांनी अग्निशमन दलाच्या 101 नंबरऐवजी गडबडीत रुग्णवाहिकेचा 108 नंबर डायल केला. माती टाकून आग विझवण्याचा प्रयत्न प्रवाशांनी केला. घटनेची माहिती कळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पाणी आग विझवण्यात आले. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान गौतम आव्हाड, श्रीकांत बडके, वाहन चालक भीम सिताफळे यांनी प्रयत्न केले.