दामिनीने दिले सख्ख्या बहिणींना जीवदान
solapur city police damini news

solapur city police damini news
सोलापूर : सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या दामिनी पथकाने नुकतेच दोघ्या सख्ख्या बहिणींना आत्महत्या करण्यापासून रोखले. वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी दामिनीच्या पथकाने कौतूक केले आहे.
विजापूर रोड परिसरातील धर्मवीर संभाजी तलाव परिसरात दोन महिला आत्महत्या करण्यासाठी आल्याची माहिती दामिनीला पथकाला समजली. काही वेळातच दामिनीचे पथक धर्मवीर संभाजी तलाव परिसरात दाखल झाले. घरगुती कारणावरुन दोन बहिणींचे एक व्यक्तीसोबत भांडण सुरु होते. रोजच्या भांडणाला कंटाळलेल्या दोघी बहिणी आत्महत्या करण्याच्या विचारात होत्या.
दामिनी पथकातील महिला पोलीस अंमलदारांनी दोघी बहिणींची समजूत काढली. भांडण करणार्या सर्वांना दामिनीने सदर बझार पोलीसांच्या ताब्यात दिले. दामिनीने वेळेवर पोचून दोघ्या बहिणींचा जीव वाचविला.
या दामिनी पथकामध्ये पोलीस नाईक दिपाली माळी, मंगळ बांबळे, पोलीस कॉन्स्टेबल कल्याणी माने, कविता कुंभार यांचा समावेश होता. गुन्हे शाखेच्या सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रीती टिपरे, दामिनी पथकाच्या प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक ज्योती कडू यांनी दामिनी पथकाचे अभिनंदन केले आहे.